आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रज्ञांचा दावा : समुद्रात ९८० फुटांच्या भिंतीमुळे हिमनदी वितळणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- हिमनद्या वितळण्यापासून रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवी युक्ती शोधली आहे. यानुसार, समुद्रात ९८० फूट उंच धातूची भिंत बांधण्याची गरज आहे. त्याने डोंंगराखाली असलेले गरम पाणी हिमनद्यांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे तुटून समुद्रात कोसळणार नाहीत व समुद्राचा जलस्तर वाढणार नाही. तसेच किनाऱ्यावरील शहरे बुडण्याचा धोकाही कमी होईल. 


शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, या भिंतीला ०.१ क्युबिक किमी ते १.५ क्युबिक किमी धातू बसवण्यात येईल. यात अब्जावधी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. अशा प्रकारचे तंत्र वापरून दुबईतील पाम जुमैरा मार्ग व हाँगकाँग विमानतळ तयार करण्यात आले. दुबईच्या पाम जुमैरासाठी ०.१ क्युबिक धातूने भिंत तयार केली. यासाठी ८६ कोटी खर्च आला. 


२०१६ मध्ये नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीने सांगितले, पश्चिम अंटार्क्टिकाचा बर्फ खूप झपाट्याने वितळत आहे. एका अहवालात म्हटले आहे की, डोंगराखाली असलेल्या भूगर्भातील गरम पाण्यामुळे बर्फ वितळत असावा. यानंतर बीजिंग विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जॉन मुरे व वोलोविक यांनी जगातील सर्वात मोठ्या हिमनदीवर अभ्यास केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...