आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला मुंबईतील बाप्पाच्या दर्शनाला.. फोटोतून अनुभवा मुंबईतील आकर्षक गणरायांचे रुप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गणेशोत्सव म्हटले जगभरातील भाविकांचे लक्ष महाराष्ट्राकडे लागलेले असते. त्यातही पुणे आणि मुंबईच्या गणेशोत्सवाला एख वेगळे वलय प्राप्त झाले आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा विविध देखाव्यांसाठी सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या गणेशोत्सवाचेही एक खास वैशिष्ट आहे. हे म्हणजे येथी गणरायाच्या विशाल मूर्ती. 


मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते ते येथील मंडळांकडून स्थापना केल्या जाणाऱ्या मूर्ती. दरवर्षी गणरायाच्या विविध रुपामधील विशालकाय गणेशमूर्तींची स्थापना मुंबईतील मंडळांकडून केली जात असते. या मूर्ती फक्त मोठ्याच असतात असे नव्हे तर अत्यंत आकर्षक आणि मनमोहक अशी रुपे या मूर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मुंबईत भाविक हे खास या मूर्त्या पाहण्यासाठी हजेरी लावत असतात. 


मुंबईतील गणेशोत्सवाचे वैशिष्टय असलेल्या याच मूर्ती आपण आज पाहणार आहोत. हौशी फोटोग्राफर हेमेन खत्री यांनी टिपलेली मुंबईतील गणरायांची विविध रुपे आपण पाहणार आहोत. हेमेन खत्री हे छंद म्हणून फोटोग्राफी करतात. ते प्रत्यक्षात आय टी क्षेत्रात काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला आहे. चला तर हेमेन खत्री यांच्या नजरेतून अनुभवुयात मुंबईतील बाप्पांचे दर्शन..

 

पुढील स्लाइड्सवर पाहा मुंबईतील अशाच काही खास गणेशमूर्तींचे PHOTOS.. 
फोटो सौजन्य - हेमेन खत्री (HK Shots)

 

बातम्या आणखी आहेत...