आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

92 वे साहित्य संमेलन : ग्रंथ दिंडीने कार्यक्रमांना सुरुवात, सांस्कृतिक देखाव्यांनी खुलले यवतमाळचे रस्ते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करण्‍यात आले. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले होते. 


ग्रंथदिंडीमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची झलक पाहायला मिळाली. पारंपरिक लेंगी नृत्यापासून ते वासुदेवासारखे विविध लोककलाप्रकार ग्रंथदिंडीत पाहायला मिळाले. लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा प्रकारचे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर विविध संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावेही होते.  ढोलपथकांनी ग्रंथदिंडीत एकच जल्लोष भरला. सहभागी झालेल्या महिलांनी फुगड्या घालत ग्रंथदिंडीचा उत्साह वाढवला. पाहुयात या ग्रंथदिंडीची झलक दाखवणारे काही PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...