आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचे 48 तास जगभरात होणार इंटरनेट शटडाऊन, तुम्हीही व्हाल त्रस्त, वाढत्या सायबर हल्ल्यांविरुद्ध सुरक्षेची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - पुढच्या 48 तासांत इंटरनेट वापरताना युजर्सना अडचणी येऊ शकतात.  Russia Todayच्या एका रिपोर्टनुसार इंटरनेट युजर्सना Connection Failure ची एरर मिळू शकते. कारण काही काळापर्यंत मेन डोमेन आणि याच्याशी संबंधित नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर डाऊन राहतील.

द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स (ICANN) यादरम्यान क्रिप्टोग्राफिक कीजमध्ये बदल करून मेंटेनन्सचे काम करेल, ज्यामुळे युजर्स प्रभावित होऊ शकतात.

 

क्रिप्टोग्राफिक कीजमध्ये बदल इंटरनेट अॅड्रेस बुक, नेम सिस्टम (DNS)ला सिक्युर करण्यासाठी केले जाते. ICANN नुसार, वाढत्या साइबर हल्ल्यांमुळे असे करणे आवश्यक झाले आहे.

कम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटीने एका स्टेटमेंटमध्ये सांगितले की, ‘जर इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर्सनी या बदलाची तयारी केलेली नसेल तर काही युजर्स यामुळे प्रभावित होऊ शकतात. तथापि, यापासून वाचण्यासाठी तुम्ही सिस्टिम सिक्युरिटी एक्स्टेंशन एनॅबल करू शकतात.’

 

पुढच्या 48 तासांत इंटरनेट युजर्सना वेब पेज ओपन करण्यात आणि ट्रांझॅक्शन करण्यात अडचणी येऊ शकतात. जुन्या इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडरच्या युजर्सना ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यातही अडचणी येऊ शकतात.

 

काय आहे ICANN?

इंटनरेट कॉर्पोरेशन फॉर असाइंड नेम्स अँड नंबर्स एक नॉन प्रॉफिट संस्था आहे, जी जगभरात इंटरनेट नेटवर्कच्या देखभाल आणि सिक्युरिटीचे काम करते. याशिवाय हीच ऑर्गनाइजेशन IP अॅड्रेस स्पेस, प्रोटोकॉल पॅरामीटर, DNS मॅनेजमेंट आणि रूट सर्वर सिस्टम मॅनेजमेंट फंक्शनचे काम करते. ही ऑर्गनाइजेशन सेंट्रल इंटरनेट अॅक्सेसच्या टेक्निकल मेंनटेनेंसचे काम करते.  

 

 

बातम्या आणखी आहेत...