Home | Maharashtra | Mumbai | Goa Chief Minister Manohar Parrikar health issue

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे ब्लड प्रेशर 'शुन्या'वर.. पॅनक्रियाटिक कॅन्सरने ग्रस्त आहेत मनोहर पर्रीकर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 04:01 PM IST

14 फेब्रुवारी, 2018 पर्रीकरांची प्रकृती खालवली होती. त्यानंतर त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते.

  • Goa Chief Minister Manohar Parrikar health issue

    पणजी- मागील एक वर्षापासून पॅनक्रियाटिक कॅन्सरने (स्वादुपिंडाचा कर्करोग) ग्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ब्लड प्रेशर शुन्यावर आल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    दरम्यान, गोव्यात पर्रीकरांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 14 फेब्रुवारी, 2018 पर्रीकरांची प्रकृती खालवली होती. त्यानंतर त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

    प्रकृती अस्वस्थ.. तरीही सादर केला होता राज्याचा बजेट
    गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला मनोहर पर्रीकरांना नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले होते. उपचारानंतर 14 ऑक्टोबरला ते गोव्यात परतले होते. पर्रीकरांनी 29 जानेवारीला गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित होते. दुसर्‍याच दिवशी पर्रीकरांनी राज्याचा बजेट सादर केला होता. नंतर 31 जानेवारीला त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते पुन्हा 5 फेब्रुवारीला गोव्यात परतले.

Trending