आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नग्‍न शरीरावर ही वस्‍तू लावून रोज वेगवेगळ्या घरात घुसते ही व्‍यक्‍ती, आणि मग...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - गोवाच्‍या एका पॉश कॉलनीमध्‍ये एक व्‍यक्‍ती पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. याचे कारण म्‍हणजे कॉलनीतील नागरिकांनी पोलिसांकडे अशी तक्रार दिली आहे, जी ऐकूण पोलिस स्‍वत: हैराण झाले आहेत. लोकांनी सांगितले की, एक व्‍यक्‍ती मागील 3 महिन्‍यांपासून त्‍यांना परेशान करत आहे. ती व्‍यक्‍ती रोज रात्री कॉलनीतील कोणाच्‍या तरी घरात शिरते आणि पूर्ण रात्र घरात झोपेत असलेल्‍या महिलांना घूरत राहते. या व्‍यक्‍तीची माहिती तेव्‍हा बाहेर आली जेव्‍हा ही व्‍यक्‍ती एका सकाळी दोन महिलांच्‍या बाजूला झोपलेला आढळून आला. मात्र त्‍याला पकडण्‍याआधीच तो जागा झाला व तेथून निसटण्‍यात यशस्‍वी झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. 


केवळ अंडरवेअर घालतो, संपूर्ण शरीराला लावतो तेल 
पोलिसांना मिळालेल्‍या तक्रारीअनूसार, ही व्‍यक्‍ती केवळ अंडरवेअर घालते व तिच्‍या पूर्ण शरीराला तेल चोपडलेले असते. ज्‍या घरात केवळ महिला असतील त्‍याच घरांना ती व्‍यक्‍ती आपला निशाना बनवते. तक्रारीनूसार, मागील 3 महिन्‍यांपासून ती व्‍यक्‍ती अधिक प्रमाणात वेगवेगळ्या घरात घुसत आहे. सकाळी साडे तीन वाजेपासून ते 4 वाजेच्‍या दरम्‍यान तो घरात शिरतो. 


काही महिलांचे अंडरगारमेंट्सही झाले गायब 
ही व्‍यक्‍ती किचन किंवा हॉलमधील खिडकीमधून घरात शिरतो. काही घरांमध्‍ये तर तेलाचे निशानही आढळून आले आहेत. तर काही महिलांनी आपले अंडरगारमेंट्सही गायब असल्‍याचे म्‍हणले आहे.  15 जून रोजी ती व्‍यक्‍ती दोन महिलांच्‍या बाजूला फरशीवर झोपलेला असताना महिलांनी त्‍याला पाहिले. महिला जागी होताच त्‍या व्‍यक्‍तीचेही डोळे उघडले व तिने तेथून धूम ठोकली. आणखी एका वेळेस ही व्‍यक्‍ती एका कपलच्‍या बेडरूममध्‍ये झोपलेला आढळून आला आहे. कपलने त्‍याला पकडण्‍याचा प्रयत्‍न करताच त्‍याने खिडकीतून धूम ठोकली. असेच एक प्रकरण उत्‍तर प्रदेशमध्‍येही समोर आले होते. तेथे छतावरून महिलांच्‍या अंडरगारमेंट्स गायब होत होत्‍या.  

बातम्या आणखी आहेत...