आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापणजी- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी मंत्रिमंडळात फेरबदल केले. काँग्रेसमधून भाजपमध्ये सामिल झालेल्या 10 पैकी 3 आमदारांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्याशिवाय भाजप आमदार आणि डिप्टी स्पीकर मायकल लोबो यांना देखील मंत्रीमंडळात घेण्यात आले आहे. याआधी सावंतांनी गोवा फॉर्वर्ड पार्टी(जीपीपी) च्या तीन आणि एका अपक्ष आमदाराची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली होती.
सावंतांनी शुक्रवारीच या आमदारांना मंत्रीपद सोडण्यास सांगितले होते. पण, जीपीपीचे म्हणने आहे की, भाजपच्या जेष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. यानंतर मुख्यमंत्री सावंतांनी उप-मुख्यमंत्री विजय सरदेसाई, विनोद पालीनकर, जयेश सळगांवकर(जीपीपी) आणि रोहन खांटी (अपक्ष) यांची हकालपट्टी केली.
काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये सामिल झाले
मुख्यमंत्री सावंत बुधवारी काँग्रेसमधील 15 पैकी 10 आमदारांना घेऊन दिल्लीत गेले. येथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ते भाजपमध्ये सामिल झाले. यात माजी नेते प्रतिपक्ष चंद्रकांत कावळेकर, जेनिफर मोन्सेराते, फिलिप नेरी रॉड्रिग्स यांना शनिवारी मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय नेतृत्वासोबत चर्चा केल्यानंतरच भाजपला समर्थन दिले होते- जीपीपी
मंत्रीमंडळातून राजीनामा मागण्यावरून जीपीपीचे मंत्री म्हणाले की, आम्ही एनडीएचा भाग आहोत आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वासोबत चर्चा केल्यानंतर राज्यात भाजपला समर्थन दिले होते. या दरम्यान राज्यातील भाजप नेतृत्वातसोबत काहीच चर्चा झाली नाही. आम्ही एनडीएच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतरच पुढील पाऊल उचलू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.