आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात मगोपच्या तीनपैकी दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्रिपदावरून ढवळीकर यांना काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी  - गोव्यातील भाजप आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्र गोमांतक पक्षाच्या (मगोप) दोन आमदारांनी मंगळवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. गोवा विधानसभेत मगोपचे तीन आमदार होते, त्यापैकी मनोहर आजगावकर आणि दीपक प्रभू पाउसकर आता 
भाजपत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी मगोपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री झालेले सुदिन ढवळीकर यांना पदावरून हटवलेे. 


मगोपमधून भाजपत आलेल्या दीपक पाउसकर यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे. गोवा विधानसभेत एकूण ४० पैकी सध्या ३६ सदस्य आहेत. त्यात भाजपच्या आमदारांची संख्या वाढून आता १४ झाली आहे. भाजप सरकारला तीन अपक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आमदारांचा पाठिंबा आहे. 


चौकीदारांचा रात्रीतून माझ्या पक्षावर दरोडा 
चौकीदारांनी रात्रीतून मगोपवर दरोडा टाकला आहे. गोव्याची जनता हे सर्व पाहते आहे, यावर काय करायचे याचा निर्णय जनता घेईल. - सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप

बातम्या आणखी आहेत...