आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबा गोव्यात करणार भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात प्रचार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: देशात पाच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीच्या काळात रामदेव बाबा गोवा राज्याचा दौरा करून भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांच्या विरोधात जनतेमध्ये जागृती करणार आहेत, अशी माहिती स्वत: रामदेव बाबांनी पत्रकार परिषदेत दिली.
बेकायदा खाणींमुळे गोव्याचे सात लाख कोटींचे नुकसान झालेले असून बेकायदा खाण व्यवसायाविरुद्ध गोव्यात जावून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपण प्रसंगी उपोषणही करू, असेही ते म्हणाले. गोव्यातून निर्यात होणार्‍या खनिजावर जेवढी रॉयल्टी मिळते, त्याच्या पन्नास टक्के गोव्याला मिळायला हवी. मात्र, प्रत्यक्षात गोव्याला निर्यात होणार्‍या खनिजावरील केवळ दहा टक्के रॉयल्टी मिळते असे त्यांनी सांगितले.
खाण माफिया, भू माफिया व ड्रग माफिया यांच्यापासून गोव्याला वाचवण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन रामदेव यांनी केले. बेकायदा खाणींमुळे जे सात लाख कोटींचे गोव्याचे नुकसान झाले त्या पैशातून संपूर्ण गोव्यात सोन्याचे रस्ते बांधणे शक्य झाले असते, असे उद्‍गार त्यांनी काढले.
गेल्या पाच वर्षांत नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गोव्या पोखरले आहे. अशा भ्रष्टाचारी नेत्यांना जनतेने पुन्हा निवडून येऊ नये, असे आवाहनही रामदेव बाबांनी केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कायदा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.