आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समलैंगिक साध्वीचा भांडाफोड: अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लागताच फरार, 16 मुलींची सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - लहान मुलींना देवी माणून पूजनाचा ढोंग करणाऱ्या साध्वीचे धक्कादायक कृत्य राजस्थानात समोर आले आहे. समलैंगिक असलेल्या या कथित साध्वीने आपल्याच आश्रमातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप लागले आहेत. सुरुवातीला एका मुलीने सर्वप्रथम या घटनेचा खुलासा केला. यानंतर आश्रमातील अनेक मुली आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगत समोर आल्या. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होण्यापूर्वीच ती फरार झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी आश्रमातून 16 अल्पवयीन मुलींची सुटका केली. तरीही आश्रम प्रशासन या घटनेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप कुटुंबियांकडून लावला जात आहे. 


बळजबरी बनवायची समलैंगिक संबंध
गेल्या अडीच महिन्यांपासून एक तरुणी या आश्रमात राहत होती. तिनेच साध्वीवर अत्याचाराचे आरोप लावले आहेत. साध्वी समदर्शी असे तिचे नाव असून पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सोबतच तिचा कसून शोध घेतला जात आहे. तरुणी अल्पवयीन आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, गेल्या अनेक दिवसांपासून साध्वी समदर्शी कुठल्याही बहाण्याने तिला बोलावून तिचे लैंगिक शोषण करत होती. ती बळजबरी तिच्यासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करत होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी पोहोचून 6 ते 16 वर्षे वयोगटातील 16 मुलींची सुटका केली. तसेच सर्वांच्या कुटुंबियांनाही बोलावण्यात आले आहे. या मुलींपैकी काही दुसऱ्या राज्यातून सुद्धा आहेत.


आरोप लावणाऱ्या मुलीचीही चौकशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप लावणारी अल्पवयीन मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून विविध आश्रमांमध्ये राहून आली आहे. तिने लावलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे देखील तपासून पाहिले जाणार आहे. सोबतच, यापूर्वीच्या आश्रमांमध्ये तिचे वर्तन कसे होते याचा पोलिस शोध घेणार आहेत. पोलिसांनी आश्रम सील केले असून त्यातील प्रत्येक वस्तूचा तपास केला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...