Home | Jeevan Mantra | Dharm | god worship for money and happiness in family

घरात धन आणि सुखाची भरभराट हवी असल्यास, या 4 देवी-देवतांची पूजा आहे आवश्यक

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 11:57 AM IST

हिंदू धर्म शांती, समृद्धी आणि उत्सवांवर विश्वास ठेवतो. याच कारणामुळे विविध देवी-देवतांसंबंधीत इतर प्रकारचे उत्सव आणि पूज

 • god worship for money and happiness in family

  हिंदू धर्म शांती, समृद्धी आणि उत्सवांवर विश्वास ठेवतो. याच कारणामुळे विविध देवी-देवतांसंबंधीत इतर प्रकारचे उत्सव आणि पूजन करण्याचे चलन भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे. ज्ञानासाठी सरस्वती, धनासाठी लक्ष्मी आणि शक्तीसाठी महाकालीचे पूजन केले जाते. चला तर मग जाणुन घेऊया घरात सुख, शांती आणि समृद्धी देणा-या देवी आणि देवतांविषयी...


  कुबेर देव
  रावणाचा सावत्र भाऊ कुबेरला महादेवाने कोषाध्यक्ष होण्याचे वरदान दिले होते. यामुळे कुबेराला सुख-समृद्धी देणारे देवता मानले जाते. देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर देवाचे पूजन केल्यानाही अनेक समस्या दूर होतात.


  महालक्ष्मी
  पुराणांनुसार महालक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनाच्या काळात झाला होता. यांच्या वडिलांचे नाव महर्षि भृगु आणि आईचे नाव ख्याति आहे. देवी लक्ष्मी कमलवनमध्ये निवास करते. कमळावरच बसते आणि हातातही कमळ धारण करते. विष्णुची पत्नी असलेल्या लक्ष्मीला धन आणि सृध्दिचे प्रतीक मानले जाते. यामुळे यांचे पूजन धन देणारे मानले जाते.

 • god worship for money and happiness in family

  गणपती
  गणपतीचे पूजन सर्वात अगोदर केले जाते. त्यांच्या नावानेच प्रत्येक शुभ आणि मंगल कार्य सुरु होते. गणपतीच्या उजव्या बाजूला स्वास्तिक आणि डाव्या बाजूला ओम काढले जाते. हे सुख शांति आणि समृध्दी देणारे आहे. याच कारणामुळे गणपतीला समृध्दीची देवता मानले जाते.

 • god worship for money and happiness in family

  विष्णु देव
  विष्णु हे जगाचे पालनहार आहेत. त्यांच्याशिवाय काहीच शक्य नाही. यासोबतच ते महालक्ष्मीचे पती आहेत. यामुळेच ज्या ठिकाणी विष्णु देवाची पूजा होत राहते, तेथे लक्ष्मी, गणेश, धन्वंतरि आणि कुबेर आपोआप विराजमान होतात.

Trending