आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एक शुक्रवारही केले हे काम तर तुमच्या घरात निवास करू शकते देवी लक्ष्मी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार काही विशेष कार्य एखाद्या विशेष दिवशी केल्यास फलदायी ठरतात. प्रत्येक व्यक्तीची त्याच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व सुख-सुविधा असाव्यात अशी इच्छा असते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, जगातील कोणत्याही व्यक्तीला धनलाभ तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा धनाची देवी लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न असते. एखाद्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी रुष्ट असल्यास त्या व्यक्तीला गरिबीला सामोरे जावे लागू शकते. पंडित शर्मा यांच्यानुसार देवी लक्ष्मीची विशेष प्रकारे पूजा केल्यास देवी भक्तावर प्रसन्न होऊ शकते. यासाठी पंडित शर्मा यांनी शुक्रवारी देवी लक्ष्मीचे करण्यात येणारे काही खास आणि सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास तुमच्याही घरात लक्ष्मीचे आगमन होऊ शकते. येथे जाणून घ्या, हे उपाय...


- शुक्रवारी जेवणात उडदाची डाळ अवश्य करावी. यासाठी तुपाचा उपयोग करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या जीवनात कधीही धन कमी पडणार नाही.


- तुम्हाला देवी लक्ष्मीला खुश करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शुक्रवारी दूध आणि साखर मिसळून खीर अवश्य तयार करावी. त्यानंतर ही खीर पाच कुमारिकांना खाऊ घालावी.


- प्रत्येक शुक्रवारी वाहत्या नदीमध्ये पांढरे फुल प्रवाहित करावे. यामुळे लक्ष्मी घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करेल.


- महिन्यातूल चौथ्या शुक्रवारी घराजवळच्या मंदिरात जाऊन मंदिराच्या प्रवेश द्वारावर बसलेल्या गरिबांना गोड आणि पांढऱ्या गोष्टी दान कराव्यात. या उपायाने देवी लक्ष्मी सर्वात जास्त आणि लवकर प्रसन्न  होते.

बातम्या आणखी आहेत...