आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे अलक्ष्मी, ऋषींसोबत झाले होते लग्न, दारिद्रतेची मानली जाते देवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागवत महापुराणानुसार, महालक्ष्मीची एक मोठी बहिणसुद्धा आहे. विविध शास्त्रामध्ये या संदर्भातील वर्णन आढळून येते. तसेच महालक्ष्मीच्या बहिणीशी संबंधित विविध मान्यता प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो, परंतु लक्ष्मीची कृपा काही लोकांनाच प्राप्त होते. शास्त्रामध्ये काही अशी कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे महालक्ष्मीची बहिण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता व्यक्तीला सुख-समृद्धी प्राप्त होऊ देत नाही. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या कामांमुळे गरिबी वाढते...

अलक्ष्मी उद्दालक मुनींशी संबंधित एक प्रसंग....
शास्त्रामध्ये महालक्ष्मीची एक बहिण सांगण्यात आली आहे. लक्ष्मीच्या या बहिणीचे नाव दरिद्रा आहे. दरिद्रा म्हणजे गरीब किंवा अलक्ष्मी. प्राचीन काळी समुद्र मंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. त्यानंतर भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचे पाणीग्रहण होऊ लागले, तेव्हा लक्ष्मीने श्रीहरिला सांगितले की - जोपर्यंत माझी बहिण दरिद्राचे लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही. त्यानंतर भगवान विष्णूंनी लक्ष्मीची बहिण दरिद्राच्या लग्नासाठी वर शोधण्यास सुरुवात केली. भगवान विष्णू दरिद्रासोबत लग्न करेल असा एकही वर शोधू शकले नाहीत. त्यानंतर शेवटी भगवान विष्णुदेवाने उद्दालक मुनींना दरिद्राशी लग्न करण्याची प्रार्थना केली. उद्दालक मुनींनी भगवान विष्णूंच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्या दोघांचे लग्न झाले. जेव्हा दरिद्रा लग्न करून उद्दालक मुनींच्या आश्रमात पोहचली तेव्हा ती आश्रमात प्रवेश करू शकली नाही. तेव्हा मुनींनी तिला विचारले की, तुम्ही आश्रमात प्रवेश का करू शकत नाहीत? या प्रश्नाच्या उत्तरात दरिद्रा म्हणजे अलक्ष्मीने येथे सांगण्यात आलेल्या गोष्टी सांगितल्या. या सर्व गोष्टी सर्वांसाठी फायद्याच्या असून यावरून समजू शकते की, सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी कोणकोणती कामे करावीत आणि कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे.

अलक्ष्मीने उद्दालक मुनींना सागितले होते गरिबी वाढवणारे कर्म...
अलक्ष्मीने सांगितले की, जे लोक सकाळी लवकर उठत नाहीत, जेथे साफ-सफाई केली जात नाही, ज्या घरामध्ये कलह असतो, ज्या घरातील लोक मळलेले वस्त्र परिधान करतात, जेथे स्त्री आणि पुरुष अधार्मिक आचरण करतात अशा ठिकाणी मी स्थायी रुपात वास करते. ही कामे करणाऱ्या लोकांना अलक्ष्मी निर्धन करते.

कोणत्या घरांमध्ये गरिबी राहत नाही...
अलक्ष्मीने सांगिलते की, ज्या घरांमध्ये नियमित झाडून काढले जाते, जेथे गायीच्या शेणाने सारवले जाते, जेथे लोक सूर्योदयापूर्वी अंथरुणाचा त्याग करतात, जेथे पूजन कर्म होतात. ज्या घरातील स्त्रिया सुंदर आणि स्वच्छ वस्त्र परिधान करतात, जेथे तुळशीची पूजा होते अशा घरामध्ये मी (अलक्ष्मी) प्रवेश करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...