आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमळाच्या आसनावर विराजित महालक्ष्मी सांगते सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 27 ऑक्टोबरला दिवाळी आहे. अश्विन मासातील अमावास्या तिथीला रात्री देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. मान्यतेनुसार जे लोक दिवाळीला लक्ष्मी पूजन करतात त्यांच्या घरात कायम सुख-समृद्धी राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कमळावर विराजित देवी लक्ष्मीची पूजा विशेष फळ देणारी मानली गेली आहे. देवी लक्ष्मीच्या या स्वरूपात सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र दडलेले आहेत. जाणून घ्या, देवीचे हे स्वरूप कोणता संदेश देते...

  • धन प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा संदेश त्यांच्याच फोटोमध्ये दडलेला आहे. महालक्ष्मीच्या चित्र आणि प्रतिमांमध्ये त्यांना कमळाच्या फुलावर विराजित पाहिले जाते. यामध्ये धार्मिक कारण तर आहेच योसाबतच कमळाच्या फूलावर विराजित लक्ष्मी जीवन प्रबंधनाचे महत्त्वपूर्ण संदेश देते.

  • महालक्ष्मी धनाची देवी आहे. धनाच्या संबंधी म्हटले जाते की, धनाचा प्रभाव सर्वात दुष्प्रभाव देणारा आहे. यामुळे माणुस मोहात पडतो. याच्या जाळ्यात अडकल्याने व्यक्तिचे पतन होणे निश्चित आहे.

  • कमळाचे फूल आपली सुंदरता, निर्मलता आणि गुणांसाठी ओळखले जाते. कमळ चिखलात उमलते परंतु त्याचा सुगंध चांगला आहे. कमळावरील लक्ष्मी संदेश देते की, ती वाईट समाजात राहुन देखील कमळाप्रमाणे निष्पाप आहे.
बातम्या आणखी आहेत...