आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदरेज : सणांच्या याच हंगामापासून अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसेल, प्राप्तिकराचा दर कमी करावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गोदरेज समूहाचे अध्यक्ष ७७ वर्षीय आदी गोदरेज आपले मत स्पष्टपणे मांडण्यासाठी प्रख्यात आहेत. १२२ वर्षे जुना गोदरेज समूह एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चरसहित १४ क्षेत्रांत काम करतो. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, सणांच्या हंगामाकडून अपेक्षा आणि समूहाच्या कार्ययोजना याबाबत विक्रोळीच्या गोदरेज समूहाच्या मुख्यालयात भास्करचे डेप्युटी एडिटर धर्मेन्द्रसिंह भदौरिया यांनी आदी गोदरेज यांच्याशी विशेष चर्चा केली. त्या चर्चेचा संपादित अंश...
 

> सणांच्या हंगामात अर्थव्यवस्थेकडे कोणत्या दृष्टीने आपण पाहता?
सणांचा हंगाम खूप चांगला जाईल.या हंगामापासूनच अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसण्यास सुरुवात होईल.अर्थव्यवस्थेत वळण येईल. पहिल्या सहामाहीच्या तुलनेत दुसरी सहामाही चांगली राहील, असे मला वाटते. सरकारने जास्त सुधारणा केल्यास अर्थव्यवस्थेत जास्त सुधारणा दिसतील. सरकारने आतापर्यंत चांगले उपाय केले आहेत,  पण अजून बरीच संधी आहे.

> अर्थव्यवस्थेत मंदीचा विविध क्षेत्रांवर काय परिणाम झाला आहे? 
सामान्यत: अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंद आहे. गेल्या तिमाहीच्या निकालांतच जीडीपी वाढ ५% राहिली आहे. सरकार लवकरात लवकर विशेष पावले उचलेल; त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी आमची आशा आहे. अर्थव्यवस्थेत मंदी असल्याने गोदरेज समूह त्यापासून दूर नाही. त्या प्रमाणात परिणाम झालेला आहे.

> अर्थव्यवस्था आणखी चांगली व्हावी यासाठी सरकारने कोणती पावले उचलावीत? 
सरकारने अलीकडेच कॉर्पोरेट कर कमी केला आहे, हे खूप चांगले पाऊल होते. अर्थव्यवस्थेत सुधारणेची अशीच पावले सरकारने उचलावीत. प्रत्येक क्षेत्राच्या हिशेबाने आवश्यक पावले उचलावीत. मी सध्या विस्ताराने शिफारशी करू शकत नाही. पण सरकारने वैयक्तिक प्राप्तिकर कमी करावा. विविध उद्योगांचे प्रतिनिधी वेळोवेळी सरकारची भेट घेतात, त्यामुळे सरकारने उद्योगांच्या शिफारशींच्या हिशेबाने त्यावर विचार करून पावले उचलावीत. जागतिक अर्थव्यवस्थेतही समस्या आल्या आहेत. अमेरिका-चीनमध्ये व्यापारी समस्या सुरू आहेत.
 

> सरकारने वैयक्तिक प्राप्तिकरात कपात केली तर घटलेल्या महसुलाची भरपाई कशी होईल? 
कर कपातीमुळे करांचे संकलन कमी होणार नाही, उलट वाढेल. अर्थव्यवस्था चांगली चालली तर कर संकलन वाढेल. अर्थव्यवस्था चांगली नसल्यामुळेच जीएसटी संकलन कमी होत आहे. कर जेवढा कमी होईल, तेवढे कर संकलन वाढेल व अर्थव्यवस्थेला गती मिळेल. समाजवादाच्या काळात प्राप्तिकराचा दर ९०% होता तेव्हा देशाची वाढ ३% होती.
 
 

बातम्या आणखी आहेत...