आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायीच्या दूध खरेदीत प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ, गोकुळकडून घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने(गोकुळ) गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. खरेदी दर वाढल्याने विक्री दरही दोन रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. अमूल, मदर डेअरीनेदेखील नुकतीच विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे.


गोकुळने संचालक मंडळाच्या बैठकीत गायीच्या दूध खरेदी दरामध्ये दोन रुपये वाढ केली आहे. ही दरवाढ 21 मेपासून दिली जाणार आहे. त्यामुळे तीन जूनच्या बिलात दूध उत्पादकांच्या खात्यात वाढ होणार आहे. ही दरवाढ 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफकरिता होणार आहे.


मार्च महिन्यात गोकुळने दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात केली होती, यामुळे दुधाचा दर 25 रुपयांवरून 23 रुपये झाला होता. त्यानंतर दूध उत्पादकांतून दूध दर कपातीचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले. लोकसभेचे मतदान झाल्यानंतर गोकुळने कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने पशुखाद्याच्या दरात प्रतिपोत्यामागे 100 रुपयांनी वाढ केली.  


शिवसेनेनेही गोकुळवर म्हशींसह मोर्चा काढला होता. पशुखाद्याचे दर कमी करावे आणि गाय दूध दरात वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. दूध उत्पादकांत निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन गोकुळने दोन रुपयांनी वाढ केल्याची चर्चा होती. आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी नेत्यांकडून डिझास्टर मॅनेजमेंट सुरू झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...