आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gold Actor Amitt Sadh Drug Addicted In Childhood Also Worked As A Security Guard

GOLD: एकेकाळी सिक्युरिटी गार्ड होता हा अॅक्टर, बालपणी लागले होते ड्रग्स-दारुचे व्यसन, आता खेळणार हॉकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता अक्षय कुमारचा 'गोल्ड' हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होतोय.  या चित्रपटात अभिनेता अमित साध हॉकी प्लेअर रघुवीर प्रताप सिंह यांची भूमिका वठवत आहे. सलमान खानसोबत 'सुल्तान' या चित्रपटात स्क्रिन शेअर करणा-या अमितचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरले आहे. त्याची आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती, की उदरनिर्वाहासाठी त्याला लोकांच्या घरी भांडी घासण्याचे काम करावे लागले होते. एका मुलाखतीत अमितने स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले होते. बालपणी ड्रग्स आणि दारुचे व्यसन जडल्याचेही त्याने सांगितले होते. अमितला 2013 मध्ये आलेल्या 'काय पो छे' या चित्रपटातून यश मिळाले.

 

अभिनयासाठी सोडले होते 12 वीचे शिक्षण...
अमित साधने सांगितले, 'काई पो छे' या चित्रपटानंतर माझ्या हातात एकही काम नव्ह.े मी दोन वर्षे बेरोजगार होतो. त्याकाळात अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला होता. माझ्याजवळ भाड्याचे पैसे देण्यासाठीही एक रुपयादेखील नव्हता.'

- अमितने सांगितले, 'काम मिळत नसल्याने माझ्यावर झालेले कर्ज कसे फेडणार याची चिंता मला लागली होती. त्याकाळात बरंच कर्ज माझ्यावर झालं होतं. ' 
- अमितने सांगितले, आयुष्यात मला बराच संघर्ष करावा लागला आहे. सात वर्षे एक चित्रपट मिळवण्यासाठी मी चपला झिजवल्या आहेत.

 

एका गोष्टीची वाटते कायम भीती...

अमित सांगतो, पुर्वीसारखी परिस्थिती माझ्यावर ओढवू नये, याची सतत आजही मला भीती वाटते. माझे बालपण हलाखीत गेले. बालपणीच मला दारु आणि ड्रग्सचे व्यजन जडले होते. पण आज मी त्या वस्तूंना स्पर्शही करत नाही. आयुष्य ट्रॅकवर आणण्यासाठी मला अभिनयाची मोठी मदत झाली. अपयश आणि आयुष्यातील वाईट काळातून अभिनयाने मला बाहेर काढले आणि मी आज या स्थानी आहे.'

बातम्या आणखी आहेत...