आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क: अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाने चार दिवसात 55 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात अक्षयसोबत टीव्हीची 'नागिन' च्या नावाने ओळखली जाणारी प्रसिध्द अभिनेत्री मौनी रॉयने बॉलिवूड डेब्यू केला आहे. आता 'गोल्ड' चित्रपटाच्या यशानंतर मौनी रॉय हवेतच आहे. यामुळे तिने आता एक्स बॉयफ्रेंड आणि टीव्ही अॅक्टर मोहित रैनाला ओळण्यासही नकार दिला आहे. एका मुलाखती दरम्यान मौनीला मोहितविषयी प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली की, 'मी सिंगल आहे आणि दिर्घकाळ अशीच राहील. ती म्हणाली की, मी मोहितला ओळखत नाही.'
जाहिरातीत काम करण्यास दिला नकार
मौनीला मोहितसोबत एका अॅड फिल्म करण्याची ऑफर मिळाली होती. परंतू मौनीने ऑफर नाकारली. या जाहिरातीत मौनी-मोहितला एक कपलची भूमिका साकारायची होती. परंतू मौनीला हे मान्य नव्हते. एका एन्टटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मौनी म्हणाली की, मोहित आणि मी कधीच मित्र नव्हतो. वर्षभरापुर्वी मोहित आणि मौनीने एकत्र मुलाखत दिली होती. यामध्ये मोहित म्हणाला होता की, तो लवकरच लग्न करतील. परंतू तो कुणासोबत लग्न करणार हे सांगितले नव्हते. हा प्रश्न मौनीला विचारण्यात आला तेव्हा तिने फक्त स्मितहास्य केले होते. या मुलाखतीनंतर मोहित आणि मोनी लग्न करणार असा अंदाज वर्तवला जात होता.
- टीव्ही अॅक्टर गौरव चोप्रा आणि मौनी रॉय यांच्यामध्ये अफेअरचे वृत्त आहे. गौरव आणि मौनी 'पती पत्नी और वो' या टीव्ही शोमध्ये दिसले आहेत. परंतू काही काळानंतर गौरव-मौनी वेगळे झाले होते.
सोशल मीडियावर केले अनफॉलो
मोहित आणि मौनी रॉयच्या ब्रेकअपच्या बातम्या गेल्या वर्षापासून सुरु होत्या. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले होते. यासोबतच दोघांचे एकत्र असलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन डिलीट केले होते. परंतू इंटरनेटवर दोघांचे अनेक फोटोज आजही उपलब्ध आहेत.
'देवो के देव महादेव' मधून सुरु झाले अफेअर
मोहित आणि मौनीची भेट 'देवो के देव महादेव' मधून झाली होती. यामध्ये मोहितने महादेव आणि मौनीने सतीची भूमिका साकारली होती. सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतू त्यांनी त्यांचे नाते स्विकारले नाही. यानंतर मौनी 'नागिन', 'नागिन 2' सारख्या प्रसिध्द शोजमध्ये दिसली. तर मोहितने 'महाभारत' आणि 'चक्रवर्तिन अशोक सम्राट' या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या.
पालकांना वाटत होते पत्रकार बनावे
28 सप्टेंबर 1985 मध्ये मौनीचा जन्म झाला. तिचे 12 पर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालय, कोच बिहारमधून झाले. यानंतर ती दिल्ली आली आणि मिरांडा हाउसमधून इंग्लिश लिटरेचरमधून ग्रॅज्यूएशन करण्याचा प्लान केला. परंतू तिच्या पालकांना वाटत होते की, तिने पत्रकार बनावे. पालकांच्या सांगण्यावरुन मौनीने जामिया-मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमधे अॅडमिशन घेतले. परंतू मौनी मध्येच मुंबईमध्ये अभिनयात नशीब आजमावण्यासाठी आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.