आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. अक्षय कुमार स्टारर 'गोल्ड' या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईत अक्षयचा 'गोल्ड' हा चित्रपट त्याचा जवळचा मित्र जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते'वर वरचढ ठरताना दिसला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी केलेल्या ट्वीटनुसार, 'गोल्ड'ने पहिल्या दिवशी 27 कोटींची कमाई केली तर, 'सत्यमेव जयते' सुमारे नऊ कोटींनी मागे राहात फक्त 18 कोटींचे कलेक्शन करु शकला.
दोन्ही स्टार्सचे चित्रपट ठरले हाइएस्ट ओपनर...
- रमेश बाला यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितल्यानुसार, 'गोल्ड' हा चित्रपट अक्षय कुमारच्या फिल्मी करिअरमधील सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. हीच गोष्ट जॉन अब्राहमलाही लागू पडते. त्याच्या आजवरच्या कुठल्याही चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 18 कोटींची कमाई केलेली नाही. 'गोल्ड' हा चित्रपट रिमा कागती यांनी तर 'सत्यमेव जयते' मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केला आहे. दोन्ही चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.