आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने पिशवीत टाकले, म्हणाले दुप्पट होतील; पिशवी उघडली असता निघाले दगडाचे तुकडे, आरोपींनी 15 मिनिटांत साधला डाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा -  येथे तिघांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसुन एका महिलेला 9 तोळ्यांचा गंडा घातला. मोबदल्यात दगडं आणि 10 रूपयांची एक नोट देऊन गेले. आरोपींमध्ये महिला आणि पुरुषासह एका 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. आरोपींनी मात्र 15 मिनिटांत डाव साधला. पीडितांनी पोलिसांत अज्ञातांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.  


शहरातील नानक नगीत किरायाने राहणाऱ्या 60 वर्षीय सुरिंदर कौरने सांगितले की, तिच्या पतीचे निधन झाले आहे. तीन मुलींचा विवाह केला आहे. आता ती एकटीच राहते. ती पावरकॉम येथून निवृत्त कर्मचारी आहे. सकाळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी तिला नानकसर गुरुद्वाऱ्याचा पत्ता विचारला. यानंतर ती तेथून निघून गेली. घरी जाताच आरोपी तिच्या घरी येऊन धडकले. पिण्यासाठी पाणी मागत आम्ही सोने दुप्पट करून देत असल्याचे सांगितले. पीडिता त्यांच्या जाळ्यात अडकून सोन्याचे 4 कडे, चैन आणि दोन अंगठ्या त्यांच्याकडे दिले. त्यांनी ते एका पिशवीत ठेवून संध्याकाळी 5 वाजता उघडण्यास सांगितले. दरम्यान घर मालक जगमोहन कौर तेथे आले. आपण फसण्याची जाणीव होताच आरोपींनी तेथून पळ काढला. 


आरोपी गेल्यानंतर घरमालकाने पीडितेला पिशवी उघडण्यास सांगतिले. पण सुरिंदर कौर पाच वाजता पिशवी उघडण्यावर अडून राहिल्या. यानंतर पिशवी उघडली असता त्यात सोन्याऐवजी दगडं आणि दहा रुपयांची नोट आढळून आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. 

बातम्या आणखी आहेत...