आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांत दिवाळीत सोने सर्वात महाग; जीएसटीचा भार ग्राहकांवर नाही, घडणावळीवरही सवलत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/भोपाळ -  धनत्रयोदशी आणि दिवाळीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. दागिन्यांव्यतिरिक्त सोन्याच्या वस्तूंचीही खरेदी होते. मात्र, गेल्या हंगामात सोने सहा वर्षांतील उच्चांकावर पोहोचले आहे. शुक्रवारी व शनिवारी मात्र किमतीत थोडी घट झाली होती. सोमवारी दिल्लीत सोने ३२,५५० रुपये प्रती दहा ग्रॅमने विक्री झाले. दिवाळीपर्यंत हे दर कायम राहतील असा सुवर्णकारांचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांनी ग्राहकांसाठी विशेष तयारी केली आहे.   


ऑल इंडिया जेम्स आणि ज्वेलरी डोमेस्टिक काैन्सिल (जीजेसी) चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी सांगितले की, सोन्याची विक्री गेल्या वर्षीप्रमाणेच होत आहे,  तर सणाच्या हंगामासाठी बाजार तयार असल्याचे जीजेसीचे माजी अध्यक्ष मनीष जैन यांनी म्हटले आहे. भविष्यात दरात वाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. देशातील प्रमुख शहरात विक्री वाढवण्यासाठी सोनार घडणावळीवर सूट, जीएसटी स्वत: भरणे, भेटवस्तू अशा ऑफर देत आहेत. बाजार कशा पद्धतीने तयार आहे त्याविषयी माहिती घेऊयात. 

 

औरंगाबाद  
सुवर्ण व्यापारी उदय सोनी यांनी सांगितले की, सोने खरेदीवर ग्राहकांना जीएसटी द्यावा लागणार नाही. जीएसटीचा भार सध्या आम्ही उचलत आहे. यामुळे ग्राहकांच्या सुमारे १० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर जवळपास ९०० रुपयांची बचत होत आहे. त्याचबरोबर कमी वजनाचे दागिने विशेष आकर्षण ठरत आहेत.

  
> रांची  
येथील सोने व्यापारी आशिष आर्य सांगतात की, किमती जास्त असल्या तरी सोन्याची मागणी चांगली आहे. घडणावळीवर ३ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे.

 

अहमदाबाद 
सुवर्णकार मनोजभाई सोनी यांनी सांगितले की, व्यवसाय मागील वर्षीच्या पातळीवरच ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मेकिंगमध्ये २०-५०  % सूट दिली आहे. अशोक चोकसी यांनी सांगितले की, पुष्य नक्षत्र व धनत्रयोदशीला गुजरातमध्ये १५०-१७५ किलो सोने विक्री होण्याचा अंदाज आहे.

 

रायपूर 
सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष हरख मालू यांनी सांगितले की, साेन्याचे भाव वाढल्याचा बाजारावर परिणाम नाही. दीपचंद कोटडिया यांनी सांगितले की, सणाच्या निमित्त लोक शगून म्हणून सोने-चांदीची खरेदी करतात. मग ती खरेदी कमी प्रमाणात असली तरी खरेदी केली जाते.

 

चंदिगड  
सुवर्णकार अनिल तलवार सांगतात की, सोने महाग असले तरी ग्राहक त्यासाठी तयार आहेत. ऑनलाइनवर त्यांना जास्त विश्वास नसल्याने ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत.   
> जालंधर 
सुवर्णकार रमण नेगी यांनी सांगितले की, गुंतवणूक तर सोन्यातच होईल. आम्ही घडणावळीवर ५०%  पर्यंत सूट देत आहोत.  

 

>  भोपाळ 
सुवर्णकार नवनीत अग्रवाल यांनी सांगितले, होलो तंत्रज्ञानाचे कमी वजनाचे दागिने कमी बजेटमध्ये चांगला पर्याय आहे. श्री सराफा असोसिएशनच्या वतीने दीपावली महोत्सव आयोजित केला आहे. अध्यक्ष नरेश अग्रवाल म्हणाले की, खरेदीवर कुपन दिले जातील.  लकी ड्रॉमध्ये २० लाखांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहेत.  

 

> जयपूर
कमी वजनासह मोती व डायमंड रोझ गोल्ड ज्वेलरीतून ग्राहकांना बाजारापर्यंत आणण्याची तयारी केली आहे. सणाच्या काळात विक्रीत ४०% वाढ होईल. सोने ३२,००० च्या वर जाईल, असा अंदाज असल्याने सप्टेंबरमध्ये बुकिंगचा सल्ला देण्यात आला होता. आधी ऑर्डर देणारे फायद्यात राहिले असल्याचे कैलाश मित्तल म्हणाले.

 

आज मंगळ पुष्यसह  त्रिपुष्कर योगही, सोने खरेदीसाठी सर्वश्रेष्ठ  

३० अॉक्टोबरला मंगळ पुष्य आणि त्रिपुष्कर योगाचा दुर्लभ संगम आहे. हा दिवस दागिने, मालमत्ता खरेदी, बांधकामाची सुरुवात करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. उज्जैनचे पंडित मनीष शर्मा यांनी सांगितले की, यानंतर धनत्रयोदशीच्या एक दिवस आधीही खरेदीचा महामुहूर्त असेल, ४ नोव्हेंबरला अमृतसिद्धी, सर्वार्थसिद्धी व त्रिपुष्कर योग यांचा दुर्लभ संयोग अाहे. या दिवशी सोने, चांदी आणि दागिने खरेदी शुभ मानली जाते. त्यानंतर ५ नोव्हेंबरला धनत्रयोदशीलाही दागिने, भांडी, घर, गाडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे शुभ आहे. ६ नोव्हेंबरला चतुर्दशीवरही  दागिने, गृह प्रवेश, गाडी, फर्निचर व गॅजेट्स खरेदी करू शकता. ७ नोव्हेंबरला दिवाळी आहे, खरेदी करण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट दिवस अाहे.

बातम्या आणखी आहेत...