आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 6 वर्षांत सर्वात महाग; 32,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर दर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सणासुदी व लग्नसराईच्या निमित्ताने खरेदीत तेजी आल्याने सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमवर 125 रुपयांनी वधारून 32,625 रुपयांवर (दिल्ली) पोहोचले. गेल्या 6 वर्षांतील हे सर्वाधिक दर आहेत. दुसरीकडे, औद्योगिक मागणीत घट झाल्याने चांदीच्या दरात 130 रुपयांची घसरण झाली. ती 39,600 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. 


गेल्या 3 दिवसांत सोने 405 रुपयांनी महागलेे. सोमवारी प्रति 10 ग्रॅम दर 32,220 रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. गुरुवारी सिंगापूरमध्ये सोन्याचे दर 1,234 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. 


अहमदाबादेतील बी.डी. ज्वेलर्सचे मालक अशोक चोकसी यांच्यानुसार, ‘दागिन्यांचा रोखीने व बिलावर होणाऱ्या विक्रीच्या दरांतील फरक खूप वाढला आहे. सध्या प्रति 10 ग्रॅमवर 1 हजार रुपयांचा फरक पडतो. यामुळे पक्क्या बिलावरून होणाऱ्या व्यवसायात घट झाली आहे. दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरांत ३३,५५० रुपयांपेक्षा जास्त तेजी येण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोन्याचे दर34,000 रुपयांवर गेल्यास दिवाळीला गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 25% कमी विक्री होऊ शकते.’

 

सणासुदी व गुंतवणुकीसाठी मागणी वाढल्याने तेजी

शेअर बाजारात घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्यामुळे लोकांनी सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे सोन्यात तेजीचा कल आहे. यासोबतच सणासुदीतील मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक सराफांकडून मोठी खरेदी होत आहे. परिणामी सोन्याचे दर वधारले आहेत.  

 

बातम्या आणखी आहेत...