आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिसला सुवर्णपदक....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिसने सुवर्ण, आकांक्षा, रुद्राक्ष, शेरॉनने रौप्य तर साहिल, साध्वीने कांस्यपदक मिळवले.  अपेक्षाने १७ वर्षांखालील २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत २ मिनिटे २७.५४ सेकंदांत सुवर्ण पटकावले.  ५० मीटर्स फ्रीस्टाइल शर्यत केनिशाने २७.२८ सेकंदांत जिंकली. २१ वर्षांखालील गटात आकांक्षाने २०० मीटर्स बटरफ्लायमध्ये रौप्य पटकावले.  


शेरऑनचे सुवर्ण हुकले :   राजस्थानच्या फिरदोस कायमखानीने २ मिनिटे ३४.११ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले.  याच वयोगटातील ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत शेरॉन साजू हिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. तिने रौप्यपदक मिळवताना ही शर्यत ३५.५२ सेकंदांत पूर्ण केली. तामिळनाडूच्या  जयवीणाने ३३.७६ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या गटात रुद्राक्षने ५० मीटर फ्रीस्टाइल बाजी मारली. 


 सुश्रूत कापसेला रौप्यपदक :  
 मुलांच्या २१ वर्षांखालील १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या सुश्रूत कापसे याने रौप्यपदक पटकावले. त्याने  १६ मि. २४.६८ सेकंदांत हे अंतर पूर्ण करताना दुसरे स्थान गाठले.  २१ वर्षांखालील ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाइल रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, साहिल पवार, सुश्रुत कापसे, अ‍ॅरॉन यांच्या संघाने ३ मि. ४३.५१ सेकंदांत रिले पूर्ण करीत कांस्यची कमाई केली.

बातम्या आणखी आहेत...