आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gold Medal To University In Kho Kho; Bronze In Volleyball, Basketball, Aurangabad University Win Three Medals On The Last Day

विद्यापीठाला खाे-खाेत सुवर्णपदक; व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅलमध्ये कांस्य, औरंगाबादच्या विद्यापीठाला शेवटच्या दिवशी तीन पदके

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद वि.मुंबई विद्यापीठ खाे-खाे चा अंतिम सामना झाला. त्यात औरंगाबादचा विद्यापीठ संघ विजयी. - Divya Marathi
औरंगाबाद वि.मुंबई विद्यापीठ खाे-खाे चा अंतिम सामना झाला. त्यात औरंगाबादचा विद्यापीठ संघ विजयी.

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात खाे-खोमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदकाची कमाई केली. विद्यापीठाने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी शनिवारी तीन पदकांची कमाई केली. यामध्ये एका सुवर्णासह दाेन राैप्यपदकाचा समावेश आहे. विद्यापीठाने बास्केटबाॅल आणि व्हाॅलीबाॅलमध्ये प्रत्येकी एका राैप्यपदकाची कमाई केली. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदाच्या स्पर्धेत १५ पदके जिंकली आहेत. यामध्ये दाेन सुवर्णपदकांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक १२ पदके विद्यापीठाला अॅथलेटिक्समध्ये जिंकता आली आहेत.

गत वेळच्या पराभवाची मुंबईला केली परतफेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने खो-खोच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात मुंबई विद्यापीठाचा १३-१२ असा एक गुण व ५.१० मिनिटे राखून पराभव केला. आघाडीच त्यांना सहज मिळवून दिली. त्यांच्या विजयाचे शिल्पकार अष्टपैलू कामगिरी करणारे पीयूष घोलम (२.२०, १.३० मिनिटे व २ गुण) व अक्षय माशाळ (१.१०,१.४० मिनिटे व ३ गुण) हे ठरले. त्यामुळेच या स्पर्धेतील सर्वोकृष्ट संरक्षकाचे पारितोषिक पीयूषने तर अष्टपैलूचे पारितोषिक अक्षयने पटकावले. सन्नीने तीन गडी बाद केले. यासह विद्यापीठाने गत वेळच्या पराभवाची मुंबईला आता परतफेड केली.

१७ वर्षांनंतर अमरावतीच्या विद्यापीठाला यजमानपद

पुढच्या वर्षी २०२० मध्ये २४ वा राज्य अांतरविद्यापीठ क्रीडा महाेत्सव विदर्भातील अमरावतीच्या संत गाडगे बाबा विद्यापीठात हाेणार आहे.तब्बल १७ वर्षांनंतर या विद्यापीठाला या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी ही स्पर्धा या ठिकाणी २००३ मध्ये आयाेजित करण्यात आली हाेती. दुसऱ्यांदा आम्ही यशस्वीपणे ही स्पर्धा आयाेजित करू, असा विश्वास अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील क्रीडा विभागप्रमुख डाॅ. अविनाश असणारे यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या रचनाची सरस खेळी

महिला गटात रचना जुवळेचे (नाबाद २.२० व ०.५०) संरक्षण आणि आरती कदम (२.४०, ४.०० व २ गुण ) यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठावर १०-९ असा ७.३० मिनिटे राखून मात केली. रचनाने संरक्षकाचे तर आरतीने अष्टपैलू खेळाडूचे पारितोषिक पटकावले. शिवाजीच्या प्राजक्ता पवार १.५० व ३ गुण हिची खेळी अपुरी पडली. तिने या स्पर्धेतील आक्रमणाचे पारितोषिक मिळवले. तृतीय स्थान पुणे व चौथे स्थान अमरावतीने विद्यापीठाने मिळवले.

महिला हँडबाॅल : यजमानांना दुसरे सुवर्ण; अमरावतीचा विद्यापीठ संघ तिसऱ्या स्थानावर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरुष संघाबरोबरच महिला हँडबाॅल संघानेही विजेतेपद पटकावित संांघिक गटात दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या हँडबाॅल महिलांच्या अंतिम सामन्यात सोलापूरने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास १३-९ असे ४ गोलने नमविले. दीपाली कौंडुभैरी, अप्सरा शेख व स्वाती जाधव या त्यांच्या विजयाच्या मानकरी ठरल्या. स्वातीने ४ तर दीपाली व अप्सराने प्रत्येकी ३ गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पुण्याच्या प्राजक्ता बोडके हिचे प्रयत्न अपुरे पडले. तृतीय स्थानासाठी झालेल्या लढतीत अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाने मुंबई विद्यापीठास १३-७ ने पराभूत केले. कल्याणी संागसबेडे व देवयाणी यांनी प्रत्येकी ३ गुण करीत संघाचा विजय सुकर केला.

 

बातम्या आणखी आहेत...