आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाच्या 6 गोष्टी, ज्या अनेक रेकॉर्ड मोडू शकतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अक्षय कुमारचा 'गोल्ड' चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हॉकी या खेळावर आधारित आहे. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर हा चित्रपट भाष्य करतो. स्वतंत्र भारतासाठी हॉकी खेळण्याचे स्वप्न पाहणारा तपन दास हॉकी टीमचा सहाय्यक व्यवस्थापक असतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली लंडनमध्ये झालेल्या 14 व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. 15 ऑगस्ट रोजी रिलीज होत असलेल्या या चित्रपटाच देशभक्तीवर प्रेरणा देणारे अनेक संवाद आहेत. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. 


1. हा चित्रपट फक्त हॉकीविषयी माहिती देतो. फक्त एका भूमिकेविषयी सांगत नाही. 
2. भारताने ऑलंपिकमध्ये आतापर्यंत तीन गोल्ड मेडल(1928, 1932, 1936) जिंकले आहेत. परंतू त्यावेळी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. यामुळे आपल्याला ब्रिटिश इंडिया म्हटले जात होते. यामुळे हे ब्रिटेनसाठी खेळल्याप्रमाणे होते. यामध्ये एक दारुचे व्यसन असणारा व्यक्ती आहे. त्याला हॉकी आणि देशावर प्रेम आहे. त्याला स्वतंत्र भारतासाठी 1948 मध्ये होणा-या ओलंपिक गोल्ड मेडल जिंकायचा आहे. परंतू रस्त्यांत अनेक अडचणी आहेत. 
3. कुणीही येईल आणि स्वतःला टीमचा कोच म्हणेल असे चालत नाही. यामुळे पहिले त्याला अथॉरिटीज जाणून घ्याव्या लागतील. तो त्यांना वचन देतो की, ‘मैं अईसा टीम लेके आएगा, अईसा टीम लेके आएगा, जो ओलंपिक में जाएगा और आपके सामने, देश के सामने गोल्ड लाके रखेगा. आई प्रॉमिस’. अथॉरिटीज मान्य करतात. परंतू तरीही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 
4. हे सर्व 1946 मध्ये घडत होते. म्हणजे स्वातंत्राच्या एकावर्षांपुर्वी घडत होते. आता त्या बंगाली कोचला मुलांना ट्रेनिंग द्यायचे होते. यासोबतच फाळणीचा प्रभाव त्यांच्यावर होऊ नये यासाठीही प्रयत्न करायचे होते. तो सतत मुलांना ट्रेनिंग देतो. याच कारणांमुळे लंडन ऑलंपिकमध्ये 'भारत' गोल्ड जिंकतो.
5. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत 'मुक्काबाज' चित्रपटातील विनीत कुमार,  ‘काय पो चे’मधील अमित साध, 'लव्ह शव ते चिकन खुराना'मधील कुणाल कपूर, प्रसिध्द अॅक्शन कोरियोग्राफर शाम कौशलचा मुलगा आणि 'मसान' मधील विकी कौशलचा भाऊ सनी कौशलसोबत टीव्ही शो 'नागिन'मधली मौनी रॉयही दिसणार आहे. 
6. रीमा कागती या 'गोल्ड' चित्रपटाचे डायरेक्शन करत आहेत. यापुर्वी त्यांना आमिर खानचा 'तलाश' चित्रपट लिहिला आणि डायरेक्ट केला होता. यासोबतच त्यांनी ‘दिल धड़कने दो’ (2015), ‘ज़िंदगी ना मिलेगी दोबारा’ (2011) आणि ‘हनीमून ट्रैवल्स प्राइवेट लिमिटेड’ सारख्या चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...