आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात सोन्याचे भाव वधारले; एका तोळ्यासाठी मोजावे लागतील तब्बल 40 हजार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोन्याच्या किमतीने आज उच्चांक गाठला आहे. सध्या भारतात प्रतितोळा सोन्याचे दर 40,000 रुपये झाले आहेत. सोन्याबरोबर चांदीचे दरही वाढले आहेत. भारतात चांदीचे दर 46,000 रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, जयपूर आणि सोन्याचा सर्वात मोठा बाजार अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 40,000 रुपयांच्याही पुढे गेले आहेत. मुंबईत सोमवारी (26 ऑगस्ट) सोन्याचे दर 40,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मुंबईतच चांदीचे दर 46,380 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.

जयपूरमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 40,020 रुपये आणि 39,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच चांदीचा दर 46,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाला. अहमदाबादमध्ये हेच सोन्याचे दर अनुक्रमे 40,000 रुपये आणि 39,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदी 46,400 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सोन्याच्या दरांनी भारताला कितीतरी मागे टाकले आहे. पाकिस्तानमधील सोन्याचे दर प्रतितोळा 80 हजारांच्या पार गेले आहेत.

भारतात 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम आहे, तर पाकिस्तानमध्ये 1 तोळा म्हणजे 11.34 ग्रॅम आहे. पाकिस्तानात 10 ग्रॅम सोन्याचा दर 75 हजार 874 रुपयांपासून 80 हजारांपर्यंत पोहोचला आहे. तसेच हाच दर पाकिस्तानमध्ये प्रतितोळा 88,550 रुपये झाला आहे.
 

भारतीय शेअर बाजार वधारला
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे परदेशी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम घरगुती बाजारावरही झाला आणि महागड्या धातुंच्या दराने उसळी घेतली. सोमवारी (26 ऑगस्ट) अमेरिकेचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क केल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर व्यापार युद्धातील तणाव कमी होण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या दरात जागतिक स्तरावर काहीशी घट झाली. भारतात देखील शेअर बाजारात 793 अंकाची वाढ पाहायला मिळाली.

बातम्या आणखी आहेत...