आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने सोन्यावरील सीमा शुल्क वाढवल्याने सोने एकाच दिवसात १,३०० रुपयांनी वधारले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई - सरकारने सोन्यावरील शुल्क वाढवल्याने दिल्ली सराफा बाजारात शनिवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात १,३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून सोने ३५,४७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. मोदी सरकारच्या पाच वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळात सोने पहिल्यांदाच इतके महागले आहे. सरकारने शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने तसेच महागड्या धातूंवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरून वाढवून १२.५ टक्के केले आहे. यामुळे शनिवारी सोन्याच्या भाव मोठी तेजी नोंदवण्यात आली.


सोन्याबरोबरच चांदीदेखील २८० रुपयांच्या वाढीसह एका आठवड्याच्या उच्चांकी ३८,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. विदेशात आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली तरी त्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसून आला नाही. लंडन तसेच न्यूयॉर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोने २३.१० डॉलर घसरणीसह १,३९९.६५ डॉलर प्रति औंसवर राहिले. 


बाजारातील तज्ञांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये रोजगाराची आकडेवारी सकारात्मक आल्याने सोन्याच्या दरावर दबाव दिसून आला. जूनमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेतील बेरोजगारी दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी जारी या आकडेवारीनुसार अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे सोन्यावर दबाव वाढला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही आठवडाभरात चांदी ०.३४ डॉलरच्या घसरणीसह १४.९७ डॉलर प्रति औंसवर राहिली.

बातम्या आणखी आहेत...