आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा धोका वाढल्याचे वृत्त आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सहा वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,४०० डॉलर प्रति औंसच्या वर गेले आहे. या आधी सप्टेंबर २०१४ मध्ये सोने याच पातळीवर होते. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात कपात करण्याचे संकेत देण्यात आल्यानंतर सोन्याच्या दरात सलग तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी आलेल्या या तेजीचे प्रमुख कारण इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत असलेला तणाव ठरले आहे.
दिल्लीच्या बाजारात सोने २८० रुपये प्रति दहा ग्रॅमने वाढून ३४,३०० रुपयांवर पोहोचले होते. देशातील अनेक शहरांच्या स्थानिक बाजारात सोन्याचे दर आपोआप विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. केवळ आर्थिक अनिश्चितता आणि व्यापारी युद्धामुळे २०१९ मध्ये सोने १० टक्क्यांपर्यंत चढले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तज्ज्ञ तपन पटेल यांनी सांगितले की, जगभरातील प्रमुख केंद्रीय बँकांनी दाखवलेल्या नरमाईच्या भूमिकेमुळे महागड्या धातूंच्या भावात तेजी आली आहे. या दरम्यान चांदी ४० रुपयांच्या वाढीसह ३९,१०० रुपये प्रति किलोग्रॅमच्याा पातळीवर पोहोचली आहे. आठवडाभराच्या दरम्यान चांदीचे दर १४० रुपयांच्या वाढीसह ३८,१८४ रुपये प्रति किलोवर पोहोचले. चांदीची नाणी १००० रुपयांच्या वाढीसह ८१,००० रुपये शेकड्यावर पोहोचले आहेत. देशात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये सोने एक टक्क्याच्या वाढीसह ३४,००० रुपये प्रति सहा ग्रॅम झाले आहे. हा एमसीएक्समधील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे.
सोन्याच्या दरात तेजीची चार मुख्य कारणे
> १. व्याजदरात कपातीचे संकेत
अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपातीचे संकेत दिले आहेत. युरोप आणि ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय बँकेनेही विकास दरात वाढीला प्रोत्साहन देण्याचे म्हटले आहे.
> २. अमेरिका आणि इराणमधील तणाव
इराणने अमेरिकी ड्रोनला पाडल्यानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान संकट वाढले आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्यावर विश्वास दाखवला.
> ३. अमेरिकी अर्थव्यवस्था
अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत आहेत. लोक चांदी व सोने यासारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
> ४. सरकारच्या वतीने सोने खरेदी
जागतिक सोने परिषदेनुसार चीन, भारत, कझाकिस्तान, रशिया, पाेलंड व हंगेरीच्या केंद्रीय बँकांनी निश्चित करण्यात आलेल्या पातळीवर साेने नेण्यासाठी त्याची खरेदी केली आहे.
पुढे काय : निकटच्या काळात सोन्याच्या किमतीत तेजी राहण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली. केंद्रीय बँका सोन्याची खरेदी करत आहेत. जागतिक बाजारात मंदीचे तसचे राजकीय अस्थिरतेची स्थिती आहे. त्यामुळे सोन्यात तेजीची शक्यता आहे. अलीकडच्या काळात सोने ३५ ते ४० डॉलर प्रती औंसने वाढून १४३५ - १४४० डॉलर प्रती आैंसवर पोहोचण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.