Home | Business | Share Market | gold prices on top due to euro falls down, business-

सोन्याची झळाळी कायम राहणार

agency | Update - May 29, 2011, 12:18 PM IST

यापूर्वी डॉलरचे मूल्य घसरत गेल्यामुळे सोन्याचे भाव वाढले होते. सध्या युरोच्या बाबतीतही असेच काही घडत आहे. युरोपातील कर्ज संकटामुळे युरोचे मूल्य कमी होच चालले आहे.

 • gold prices on top due to euro falls down, business-

  bangle_288_01सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले असून येत्या काळातही सोन्याच्या भावाची झळाळी कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे भाव कधी-कधी कमी झाल्याचे दिसून आले तरी ते काही काळानंतर पहिल्याच जागेवर गेल्याचे अनेकदा दिसून आले आहे. याला प्रमुख कारण आहे सतत बदलत राहणारी जागतिक अर्थव्यवस्था. शिवाय सोन्यातील प्रमुख निर्यातदार देश व या क्षेत्रातील दलाल/ बडे गुंतवणूकदार सोन्याचे भाव कधीही खाली आणू देत नाहीत.

  जागतिक पातळीवर सतत बदलत राहणारी अर्थव्यवस्था हे एक प्रमुख कारणे मानले जाते. यापूर्वी डॉलरचे मूल्य घसरत गेल्यामुळे सोन्याचे भाव वाढले होते. सध्या युरोच्या बाबतीतही असेच काही घडत आहे. युरोपातील कर्ज संकटामुळे युरोचे मूल्य कमी होच चालले आहे. तसेच युरोपीय देशांची सध्याची अर्थव्यवस्थेचे वाढ व स्थिती पाहता युरोच्या मूल्यवाढीबाबत प्रश्न उठवले जात आहेत. त्यामुळे युरोपमधील मोठे गुंतवणूकदार युरोमधून आपली गुंतवणूक काढून सध्या सोन्यात करत आहेत. अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी डॉलरच्या घसरणीवेळी असाच फॉम्युला वापरला होता.

  युरोपातील नागरिकही यामुळे सोन्याची खरेदी करत सुटले आहेत. युरोचे घसरते मूल्य पाहता तज्ञांचा अंदाज व्यक्त केला आहे की, येत्या काही काळात सोन्याचे भाव प्रतितोळा १६५५ डॉलरपर्यंत जातील. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा भाव प्रतितोळा २३ हजाराच्या घरात जातील.

  सध्या सोन्याला जगभर खरेदीची मागणी असून पुढील काही महिने तरी सोन्याची झळाळी कायम राहील, असे सांगितले जात आहे. बदलत्या व कमी-जास्त होत राहणाऱया अर्थव्यवस्थेत सोन्यातील गुंतवणूक कायम फायद्याची ठरत आली आहे. त्यामुळे ज्या देशाची चांगली व वाढती अर्थव्यवस्था आहे असे देश सोन्याची मोठी खरेदी करतात.

  गेल्या काही वर्षात चीनने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली होती. भारत सरकारने फार सोने खरेदी केले नसले तरी जगात सर्वांधिक भारतीय नागरिकांनी सोन्याची खरेदी केली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे.Trending