आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात १०९% पर्यंत वाढेल सोन्याचा पुनर्वापर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन सोने खरेदी करण्याऐवजी जुन्यापासून दागिने तयार करण्याकडे कल
  • या वर्षी ३००-३५० टन जुन्या सोन्यापासून दागिने बनवले जाणार

विनोद यादव 

मुंबई - देशात सोन्याचा पुनर्वापर करून लग्नासारख्या महत्त्वपूर्ण औचित्यासाठी दागिने तयार करण्याचा ट्रेंड चांगलाच चर्चेत आहे. या वर्षभरात ७००-८०० टन सोन्याच्या मागणीची शक्यता होती. मात्र सोन्याचे दर आटोक्यात न आल्यास मागणी ५००-५५० टनांवर घसरू शकते, तर सोन्याचा पुनर्वापर १०९ टक्क्यांपर्यंत वाढेल. व्यापार व उद्योग मंत्रालयाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार सोन्याची आयात सुमारे ८.५ टक्के कमी झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ च्या शेवटच्या महिन्यांत सोन्याच्या आयातीत घट झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालातून निदर्शनास आले आहे. तसेच एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान सोन्याच्या आयातीत ९ टक्के घट झाली आहे. भारत जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश असतानाची ही आकडेवारी आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन सांगतात की, जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ४० टक्के सोन्याचा पुनर्वापर झाला आहे. हाच वेग कायम राहिल्यास देशात ६५ ते ७० टक्के सोन्याचा पुनर्वापर होऊ शकतो. दरम्यान, २०१९ मध्ये वर्षभरात ११९.५ टन सोन्याचा पुनर्वापर झाला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या शेवटच्या तीन महिन्यांत २९.१ सोन्याचा पुनर्वापर झाला होता, हे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालातून समोर आले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) अध्यक्ष आणि रिद्धीसिद्धी बुलियन्सचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी यांच्यानुसार २०२० मध्ये सोन्याच्या पुनर्वापरामध्ये गतवर्षाच्या तुलनेत सुमारे १०९ टक्के वाढ होऊन २५० टनांच्या जवळपास राहण्याची अपेक्षा आहे. ते सांगतात की, मुंबईसह देशातील सर्व प्रमुख बाजारांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात जुने सोने वितळवून गरजेनुसार दागिने बनवत आहेत. 

सोन्यात गुंतवणुकीचा ट्रेंड :


देशात सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढत आहे. लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्याऐवजी आणि सोन्याचे दागिने तयार करण्याऐवजी ५ ग्रॅम, १० ग्रॅम किंवा १०० ग्रॅम अशा छोट्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. या प्रकारची गुंतवणूक महिला करत आहेत. या वर्षी ३००-३५० टन जुन्या सोन्यापासून दागिने बनवले जाणार


मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन सांगतात की, गेल्या काही वर्षांपासून भारतात ८००-८५० टन सोन्याची मागणी वर्षभरात असते. दर ४४ हजार प्रती १० ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे या वर्षी ३००-३५० टन जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून दागिने तयार करण्याची शक्यता आहे. देशात आयात होऊन जेवढे सोने येते त्यातून सुमारे ५००-५५० टन सोन्याला हॉलमार्किंग करून दागिने तयार केले जातात.बातम्या आणखी आहेत...