आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 773 रुपये, तर चांदी 192 ने वाढली, सुरक्षित पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावात गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायाचा कल सोन्याकडे कायम आहे. यामुळे सोने दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी ७७३ रुपये वाढीसह ४५,३४३ रु. प्रती १० ग्रॅमवर पोहोचले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. याआधीच्या व्यावसायिक सत्रात सोने ४४,५७० रु. प्रती १० ग्रॅमवर बंद झाले होते.  सोन्याच्या धर्तीवर चांदीही १९२ रुपये वाढीसह ४८,१८० रु. प्रती किलोवर बंद झाली. दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या भावाने ७७३ रु. वाढीसह ४५,३०० रुपयांची पातळी पार केली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वृद्धीसह १,६७८ डॉलर प्रतिऔंसवर होते. चांदी १७.३४ डॉलर प्रतिऔंसवर होती.

बातम्या आणखी आहेत...