आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतून सोने तस्करी; सव्वा किलो सोने,23 किलो चांदी जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी । भुसावळ -  जीएसटीसह अन्य कर न भरता मुंबई-फिराेजपूर पंजाब मेलमधून भोपाळ व इटारसीला नेले जाणारे सव्वा किलो सोने, २३ किलो चांदी, महागडी घड्याळे, आयफोन असा ६८ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज आरपीएफने रविवारी रात्री भुसावळ रेल्वेस्थानकावर पकडला. या प्रकरणी कुरियर कंपनीचे कर्मचारी असलेल्या दोन संशयितांना आरपीएफने ताब्यात घेतले. दोन्ही संशयितांसह आरपीएफने मुद्देमाल कस्टम एक्साइज विभागाच्या ताब्यात दिला. कस्टम एक्साइज विभागाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.  कुलदीप यादव (रा.भाेपाळ) व भगवानदास (रा. हाेशंगाबाद) अशी दोघांची नावे आहेत.   


रेल्वेची नियमित तपासणी करण्यासाठी अारपीएफचे वरिष्ठ अायुक्त अजय दुबे यांनी सीपीडीएस पथक तयार केले आहे. यातील एका पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...