आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजळून देण्याचा बहाणा, महिलेची फसवणूक करून अडीच लाखांचे सोने लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- सोने उजळून देण्याच्या बहाण्याने दोन ठगांनी महिलेची फसवणूक करून आठ तोळे सोन्याचे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी माजलगावमध्ये घडली. शहर ठाण्यात या प्रकरणी उशिरापर्यंत तक्रार नोेंदवण्याचे काम सुरू होते. 


माजलगाव शहरातील विवेकानंद नगर भागात शेखर कदम यांचे घर आहे. बुधवारी दुपारी घरात महिलाच असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या . तुमच्या अंगावरील सोने काळे पडले आहे. आम्ही सोने उजळून देतो असे म्हणत त्यांनी महिलांना सोने उजळण्यासाठी तयार केले. महिलांनी अंंगावरचे व घरातील असे जवळपास ८ तोळ्यांचे दागिने ठगांकडे दिले. मात्र सोने घेतल्यानंतर उजळून आणून देतो म्हणत त्यांनी पोबरा केला. 


पोलिस म्हणाले पावत्या द्या
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेखर कदम व कुटुंबीयांनी माजलगाव शहर पोलिसांत तक्रार देण्यासाठी धाव घेतली मात्र पोलिसांनी लंपास झालेल्या सर्व साेन्याच्या पावत्या दाखवण्यास सांगितले. ऐनवेळी सर्व पावत्याा वेळेत न सापडल्याने सकाळी साडेअकरा वाजता गुन्हा घडूनही सायंकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. 

बातम्या आणखी आहेत...