Home | Business | Business Special | Gold to reach 5-year high by December: Goldman Sachs

डिसेंबरपर्यंत सोने 5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता : गोल्डमॅन सॅक्स 

वृत्तसंस्था | Update - Jan 12, 2019, 09:36 AM IST

जागतिक पातळीवर किमतीत तेजी आल्यास त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून येतो. 

 • Gold to reach 5-year high by December: Goldman Sachs

  नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात या वर्षी डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव १,४२५ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. साडेसहा वर्षांतील ही सोन्याची सर्वाधिक किंमत असेल. वित्त सेवा देणारी कंपनी गोल्डमॅन सॅक्सने हा अंदाज वर्तवला आहे. याआधी मे २०१३ मध्ये सोने १,४०० डॉलर प्रति औंसवर होते. त्या वेळी भारतीय बाजारात सोने २७,२०० रुपये प्रती १० ग्रॅम आणि डॉलर ५४ रुपयांच्या जवळपास होता. देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय किमतीनुसार बदलतात. जागतिक पातळीवर किमतीत तेजी आल्यास त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून येतो.


  आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या वर्षी ऑगस्टपासून आतापर्यंत ११% वाढ
  या वर्षी दरात १० % वाढ

  - शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात भाव १,२९४ डॉलर आैंस होते.
  - म्हणजेच २०१९ दरम्यान सोन्याच्या दरात १० टक्के वाढ होऊ शकते.
  - गेल्या वर्षी ऑगस्टपासून आतापर्यंत सोने ११ टक्के महाग झाले आहे.
  - शुक्रवारी दिल्लीमध्ये सोने ३३,०३० रुपये प्रति १० ग्रॅम होते.

  यामुळे किमतीत वाढ होण्याची शक्यता
  - राजकीय तणाव वाढल्यामुळे केंद्रीय बँका जास्त सोने खरेदी करत आहेत.
  - मंदीची शक्यता वाढत असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे.
  - गुंतवणूकीचे सुरक्षित माध्यम म्हणून लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

  आठवडाभरात कच्च्या तेलाच्या दरात दोन वर्षांतील सर्वाधिक तेजी
  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव शुक्रवारी ६१.७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात ८ टक्के वाढ झाली आहे. दोन वर्षांतील आठवडाभरात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. अमेरिका-चीनदरम्यान व्यापारी तणाव आणि ओपेक देशांच्या तसेच रशियाच्या वतीने १२ लाख बॅरल दररोजच्या तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय यामुळे ही भाववाढ झाली आहे.

  आशियातील सर्वात मजबूतवरून सर्वात कमजोर चलन झाले रुपया
  रुपया दोन आठवड्यांत आशियातील सर्वात चांगल्या चलनावरून सर्वात खराब चलन बनले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, कच्च्या तेलाच्या आयातीमुळे वाढलेली व्यापारी तूट आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना पॅकेज देण्यावर सरकार खर्च वाढवणार असल्याची शक्यता. या सर्व कारणांमुळे रुपयात घसरण होत आहे. या वर्षी दोन आठवड्यांत रुपया १.५३ टक्के घसरला आहे. गेल्या वर्षी हा सुमारे १३ टक्के घसरला होता.

Trending