आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने झाले महाग, परतावाही कमी; ८ वर्षांत मागणीमध्ये २४% घट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - मुंबईत राहणाऱ्या सल्लागार शिल्पाश्री जगन्नाथन या २०१२ पर्यंत साेन्यात गुंतवणूक करीत हाेत्या. परंतु आता त्यांचा म्युच्युअल फंडावर जास्त विश्वास आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ ६ ते ७ म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करत वर्षाला २० टक्के परतावा मिळत आहे. असा विचार केवळ शिल्पाश्री याच करत आहेत असे नाही. देशभरात साेन्याच्या मागणीत घट हाेत आहे. 'द इकाॅनाॅमिस्ट'च्या एका ताज्या अहवालानुसार देशात २०१० पासून आतापर्यंत साेन्याच्या मागणीत २४ टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु याचा उलटा परिणाम म्हणजे जगभरात साेन्याची मागणी वाढत आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार २०१८ मध्ये साेन्याची जागतिक मागणी ४३४५. १ टन हाेती. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत साेन्याची जागतिक मागणी ४ टक्क्यांनी जास्त आहे. दागिन्यांची खरेदी असाे वा गुंतवणूक आतापर्यंत आपली पहिली पसंती ही साेन्याला हाेती. त्यामुळे देशातील साेन्याची घटलेली मागणी धक्कादायक आहे. 

 

रिलायन्स कमाेडिटीजचे कमाेडिटी प्रमुख प्रीतम कुमार पटनायक यांनी सांगितले की, किमती वाढल्यामुळे साेन्याच्या मागणीत थाेडी घट झालेली आहे. गेल्या चाैथ्या तिमाहीत साेन्याची मागणी १८०.१ टन हाेती. याउलट याच कालावधीत वर्षभरापूर्वी ही मागणी १८२.४ टन झाली. जागतिक सुवर्ण परिषदेला माहिती उपलब्ध करून देणाऱ्या मेटल फाेकसचे वरिष्ठ सल्लागार चिराग सेठ यांच्या म्हणण्यानुसार, साेन्यात चांगला परतावा मिळत नसल्यामुळे लाेकांची पसंती कमी झाली आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया कमजाेर झाल्यामुळे या वर्षातही साेन्याच्या किमतीत वाढ झालेली आहे. 

 

देशभरात सोन्याची मागणी कमी होत असल्याची ही आहेत कारणे 

> साेन्यात १० टक्के परतावा 
गुंतवणुकीसाठी पहिली पसंती साेन्याला असते. एडलवाइज अॅसेट मॅनेजमेंट आणि केडिया कमाेडिटीच्या म्हणण्यानुसार २०१९-२० या वर्षात साेन्यामध्येे केवळ १० ते ११% च परतावा मिळेल. याउलट शेअर बाजारात (निफ्टी) १८% आणि म्युच्युअल फंडात १५% परतावा मिळेल. 

 

> करांमुळे अडचणी 
नाेटबंदीमुळेही साेन्याच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने साेन्याच्या खरेदीवर कर १% ने वाढवून तो ३ % वर नेला आहे. इतकेच नाही तर साेन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवरही १३% जीएसटी लागू केला आहे. 

 

> किमतीत १२% वाढ 
आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डाेमॅस्टिक काैन्सिलचे अध्यक्ष अनंथा पद्मनाभन यांच्या म्हणण्यानुसार मागणी घटण्यासाठी साेन्याच्या वाढलेल्या किमती हे प्रमुख कारण आहे. आतापर्यंत वर्षभरात साेन्याच्या किमतीत १० ते १२% वाढ झाल्यामुळे लाेक साेने खरेदी करीत नाहीयेत. 

बातम्या आणखी आहेत...