जपानमध्ये ग्राहकांसाठी बनवला सोन्याचा बाथटब; इतके आहे भाडे

दिव्य मराठी

Apr 27,2019 08:52:00 AM IST

टाेकियो - जपानमधील एका रेस्तराँने ग्राहकांना आरामदायी वाटावे म्हणून सोन्याचे बाथटब बनवले आहे. ते १३० सेंटीमीटर रुंद व ५५ सेंमी खोल आहे. त्यात एक-दोन वेळा स्नान करता येऊ शकते.


ग्राहकांना हे टब १ ते १० तासांपर्यंत भाड्याने घेता येऊ शकते. त्यासाठी एक तासाचे तीन हजार रुपये मोजावे लागतील. हुईस टेन बॉच यांनी ते तयार केले आहे. १८ कॅरेटच्या सोन्यापासून हे बाथटब बनवण्यात आले आहे. गिनीज बुकमध्ये या बाथटबची नोंद झाली आहे. चीन व दक्षिण कोरियातील पर्यटकांसाठी ते तयार करण्यात आले आहे. कारण हे पर्यटक अशी मागणी करतात. त्यामुळे आम्ही हे तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

X