आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून गोव्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी : ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी दुपारी ३ वाजता ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या उद्घाटन सोहळ्यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, श्रीपाद नाईक यांच्यासह अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि माधुरी दीक्षित यांची उपस्थिती असणार आहे. तसेच सूत्रसंचालन करण जोहर करणार आहे.
९३०० डेलिगेट्स रजिस्ट्रेशन या ५० व्या इफ्फीसाठी जगभरातून झाले असून, गोवा कॉलेज ऑफ आर्ट््स येथील २०० विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारदेखील या वेळी सादर केले आहेत.
दरम्यान, इफ्फीमध्ये ७६ देश सहभागी झाले असून ३०० पेक्षा अधिक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच या ५० व्या वर्षानिमित्त गोव्यातील सिनेमागृहांच्या ३ स्क्रीनदेखील वाढवण्यात आले आहेत. इफ्फीसाठी १८ कोटी गोवा सरकारने आणि २२ कोटी एमआयबीने दिले असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.पाच मराठी चित्रपटांची निवड…
 
यावर्षीच्या पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित भोंगा, आदित्य राही आणि भाग्यश्री पाटील दिग्दर्शित फोटो फ्रेम, अनंत महादेवन दिग्दर्शित माय घाट क्राइन नंबर १०३/२००५ आणि तुझ्या आईला या मराठी चित्रपटांचा समावेश आहे, तर नॉन फीचर फिल्ममध्ये स्मिता तांबेची भूमिका असलेला गढूळ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.५० महिला दिग्दर्शकांचे चित्रपट


चित्रपट महोत्सव संचालनालय गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात इफ्फीचे आयोजन केले जात आहे. या वेळी ५० महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले ५० चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत. याशिवाय दिवंगत गिरीश कर्नाड, मृणाल सेन, कादर खान आदी सिनेकलाकारांच्या योगदानाचे इफ्फीत विशेष स्मरण केले जाणार आहे. तसेच माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात इफ्फीची संस्कृती रुजावी म्हणून दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणारा ५ मिनिटांचा माहितीपटदेखील दाखवला जाणार आहे.