आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोलमाल फाइ‌व्ह' असेल रोहितच्या चित्रपटाचे नाव, या कारणामुळे करण्यात आला नावात बदल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'सूर्यवंशी' नंतर राेहित शेट्टी 'गोलमाल 5' वर काम सुरू करणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहितने याची घोषणाही केली होती. त्याला चित्रपटाची कल्पनादेखील सुचली असून तो लवकर चित्रपटावर काम सुरू करणार आहे. पुढच्या वर्षी याचे चित्रीकरण सुरू होईल. चित्रपटाचे कथानक निश्चित झाले आहे. आता निर्माते संवाद आणि स्क्रीन प्लेवर काम करत आहेत. अजय देवगण या चित्रपटात मेन लीडमध्ये झळकणार आहे. 

13 वर्षांपूर्वी रोहितने 'गोलमाल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या चित्रपटाने माझे आयुष्य बदलून गेले, अशी पोस्ट रोहितने 14 जुलै रोजी इन्स्टाग्रामवर टाकली होती. आता याच सीरिजचा पाचवा भाग रोहित घेऊन येतोय.