आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमा, कंबरेच्या दुखण्यात फायदेशीर आहे गोमुखासन, होतात इतरही खास फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे आसन करताना आकार गायीच्या मुखासारखा होतो. यामुळे याला गोमुखासन म्हणतात. हे करण्यासाठी तुम्ही दोन्ही पाय समाेर पसरून बसा. आता हाताला बाजूला ठेवा. डाव्या पायाच्या गुडघ्याला दुमडा. आिण उजव्या नितंबाच्या बाजूने जमिनीवर ठेवा. अशाप्रकारेच उजव्या पायाच्या गुडघ्याला दुमडा. आता डाव्या पायाच्या वरून आणा आिण उजव्या टाचेला डाव्या नितंबाजवळ ठेवा. ही क्रिया शांतपणे करा. 

- आता डाव्या हाताला उचला आिण कोपराला दुमडून मागे आणि खांद्याच्या खाली आणा. 


- आता उजवा हात उचला, कोपराला दुमडा आिण वरच्या बाजूला नेऊन पाठीवर आणा. 


- दोन्ही हातांच्या बोटांना पाठीवर एकमेकांत गुंतवून ठेवा. 


- अाता डोक्याला कोपरावर टेकवून थोडासा मागे धक्का देण्याचा प्रयत्न करा. 


- जास्तीत जास्त समोर पाहण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या हिशेबाने आसन धारण करा. हे अर्ध चक्र झाले. पायांची आिण हातांची अवस्था बदलून याला परत करा. आता एक चक्र पूर्ण होईल. याप्रकारे तुम्ही तीन ते पाच चक्र करा. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या आसनाचे फायदे आणि केव्हा करू नये...

बातम्या आणखी आहेत...