Gondia Accident / Accident / शेतात काम करण्यासाठी निघालेल्या मजुरांचे ट्रॅक्टर नाल्यात कोसळले; 4 जणांचा जागीच मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील दवा गावातील दुर्घटना, इतर 13 मजूर जखमी

दिव्य मराठी

Jul 28,2019 12:28:00 PM IST

गोंदिया - येथील दवा गावात मजुरांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. मजुरांनी भरलेले हे ट्रॅक्टर नाल्यात कोसळल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 13 मजूर जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मजुरांनी भरलेला हा ट्रॅक्टर दवा गावातील एका शेतात काम करण्यासाठी निघाला होता. त्याच दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नाल्यात जाऊन कोसळले. गोंदिया-साकोली महामार्गावरील डव्वा येथे रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. त्यातही जखमी 13 मजुरांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

X