आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसर्‍या दिवशी 'गुड न्यूज'चा व्यवसाय वाढला, तीन दिवसांत 66 कोटींची झाली कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अक्षय कुमारचा विनोदी चित्रपट 'गुड न्यूज' बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रदर्शन करत आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने सुमारे 66 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी रविवारी 26.65 कोटींचा व्यवसाय केला. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात दिलजित दोसांझ, कियारा अडवाणी आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल : म्हैसूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने चित्रपटाच्या विषयाबाबत याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाची कहाणी देशातील आयव्हीएफ केंद्रांची प्रतिमा खराब करीत आहे. चित्रपटात आयव्हीएफ सेंटरमध्ये समान आडनावामुळे दोन जोडप्यांमधील स्पर्म एक्सजेंचवरुन उडालेला गोंधळ दाखवण्यात आला आहे.