• Home
  • News
  • 'Good News' earned Rs 300 crore worldwide; 'Tanhaji' continues to perform better

बॉक्स ऑफिस / 'गुड न्यूज' ने वर्ल्डवाइड कमावले 300 कोटी रुपये, अवघ्या चार दिवसांत 'तान्हाजी' पोहोचला 75 कोटींच्या घरात

दीपिका पदुकोणच्या 'छपाक'ची कमाई फक्त 21.37 कोटी इतकी झाली आहे.  

दिव्य मराठी वेब टीम

Jan 14,2020 04:36:00 PM IST


बॉलिवूड डेस्कः अभिनेता अक्षय कुमारच्या 'गुड न्यूज' या चित्रपटाने जगभरात ग्रॉस 300 कोटींची कमाई केली आहे. धर्मा प्रॉडक्शन्सचा अपूर्व मेहता यांनी ही माहिती ट्विटरवर दिली. चित्रपटाने रिलीजच्या 19 दिवसांत हा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने ग्लोबली ग्रॉस 201 कोटी रुपये अवघ्या सात दिवसांत कमावले होते. अक्षयसह चित्रपटात दिलजीत दोसांज, कियारा आडवाणी आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. दुसरीकडे, नवीन वर्षांत रिलीज झालेल्या अजय देवगण स्टारर 'तान्हाजी'ने चार दिवसांत 75.68 कोटींचा व्यवसाय केला आहे.

स्पर्म एक्सचेंज या विषयावर बनलेला हा कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपटाने रिलीजच्या दिवशी 17.56 कोटींची कमाई केली. तर पहिल्या आठवड्यात हा कमाईचा आकडा 127.90 कोटी झाला. ट्रेड अ‍ॅनालिस्टच्या आकलनानुसार, 'गुड न्यूज'मुळे सलमान खानचा 'दबंग 3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मनासारखी कामगिरी करु शकला नाही.

छपाक v तानाजी
10 जानेवारी 2020 रोजी रिलीज झालेले दोन मोठे हिंदी चित्रपट 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'छपाक'ची बॉक्स ऑफिसवरची टक्कर सुरु आहे. अजय देवगणच्या 'तान्हाजी'ने चार दिवसांत 75.68 कोटींचा व्यवसाय केला. तर अॅसिड अटॅक सब्जेक्टवर बनलेल्या बनी दीपिका पदुकोणच्या 'छपाक'ची कमाई फक्त 21.37 कोटी इतकी झाली आहे.

X
COMMENT