आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच आई होणार आहात तर सरकार देणार 6000 रुपयांची मदत, लाभ घेण्यासाठी येथे करू शकता संपर्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - आपण जर पहिल्यांदाच आई होणार आहात तर सरकारकडून 6000 रुपयांची मदत आपल्याला मिळू शकते. पंतप्रधान मातृत्व वंदना योजना किंवा पंतप्रधान गर्भावस्था सहायता योजना (PMMVY) अंतर्गत सरकार पहिल्या बाळाच्या जन्मासाठी 6000 रुपये आईला देत आहे. या योजनेचा लाभ कुठल्याही वर्ग आणि जातीच्या महिलेला मिळेल. त्याचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेला योग्य वेळी लसिकरण आणि जवळच्या आरोग्य केंद्रात नोंदणी करावी लागेल. आतापर्यंत या योजनेचा 60 लाख गर्भवती महिलांना लाभ मिळाला आहे.


योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा संपर्क
पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेत नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र किंवा जवळच्या आरोग्य सेवा केंद्रात जाऊ शकता. यामध्ये नोंदणी करण्यासाठीचा अर्ज थेट अंगणवाडीतून मिळू शकेल. हा अर्ज विनाशुल्क आरोग्य केंद्रात सुद्धा उपलब्ध आहे. अथवा महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तो डाउनलोड देखील केला जाऊ शकतो.


असे करा नोंदणी
पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेत मदत निधी तीन हप्त्यांमध्ये दिला जाणार आहे. यासाठी तीन वेग-वेगळे फॉर्म अर्थात फॉर्म- 1-ए, 2-बी आणि 3-सी भरावे लागणार आहेत. पहिल्यांदा नोंदणी करत असताना आपल्याला फॉर्म- 1-ए अंगणवाडी केंद्रात जमा करावा लागेल. तर दुसरे आणि तिसरे फॉर्म नियमित वेळेनुसार, जमा करावे लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...