आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good News : Jay Bhanushali's Wife Mahi Vij Is Prganant, Told About The Good News On Social Media

Good News : जय आणि माहीच्या घरी येणार आहे एक चिमुकला पाहुणा, सोशल मीडियावर सांगितली ही आनंदाची बातमी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध जोडी माही विज आणि जय भानुशाली यांच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. माही आणि जयने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेयर करून फॅन्सला ही, आनंदाची बातमी सांगितली आहे. या फोटोमध्ये तुम्हाला माही आणि जयची झलक पाहायला मिळते, त्यांच्या डेट ऑफ ईयर (1982 आणि 1984) सोबत त्यांच्या बाळाचे डेट ऑफ ईयर 2019 लिहिलेले आहे. 

 

फोटोसोबत लिहिला खास मॅसेज... 
फोटो शेयर करून जयने लिहिले, 'वेदनेचे 9 महिने, पण आयुष्यभराचा आनंद. आजाराचे 9 महिने, पण आयुष्यभराचा आनंद. गर्भावस्तेचे 9 महिने, आमच्या भावी पिढीची सुरुवात. माहीचे खूप खूप धन्यवाद, मी आमच्या पहिल्या बाळाची गुड न्युज सांगत आहे. 2019 मध्ये लवकरच येत आहे.'

जय भानुशालीची इंस्टाग्राम पोस्ट... 

माहीने हा फोटो अपलोड करून लिहिले, 'एक मुलगी मुलाला भेटते आणि दोघे जण आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतात. आता दोन पशांच्या या घरात तिसरे कुणीतरी येणार आहे.'

माहीची इंस्टाग्राम पोस्ट... 

 

 

दोघांनी दत्तक घेतली आहेत दोन मुले... 
माही आणि जयने आपल्या घरात काम करणाऱ्या मनोज नावाच्या व्यक्तीची दोन मुले दत्तक घेतली आहेत. त्यांचा पूर्ण खर्च ही जोडी करते. मनोजचा मुलगा राजवीर 3 वर्षांचा आहे आणि मुलगी खुशी 5 वर्षांची आहे.  

 

टीव्हीची प्रसिद्ध जोडी आहे माही आणि जय...   
जय आणि माही शेवटचे एकत्र 'किचन चॅम्पियन सीजन 5' दिसले होते. दोघे तिच्या प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहेत. माहीने टीव्ही सीरियल 'बालिका वधू' यामध्ये नंदिनीची भूमिका साकारली होती. यासोबतच माहीने टीव्ही सीरियल 'लागी तुझसे लगन'मधेही काम केले आहे. जयबद्दल सांगायचे तर त्याने अनेक टीव्ही शोज होस्ट केले आहेत आणि एक बॉलिवूड फिल्म 'हेट स्टोरी 2' मध्येही काम केले आहे.