आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good News: Now You Can Get A Loan For Medical Emergency Up To 20 Lakh Without Interest

अचानक आजारी पडल्यावर उपचारांसाठी पैसे नसतील, तर घ्या या सुविधेचा लाभ; बिनव्याजी मिळतील 20 लाख रुपयांपर्यंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अशा अनेक स्टार्टअप आहेत ज्या आता हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठीही लोन देत आहेत. विशेष बाब अशी की, हे लोन बिनव्याजी आहे. यात फक्त प्रोसेसिंग फीस रुग्णाला द्यावी लागते. जर तुम्ही कधी अचानक आजारी पडलात आणि उपचारांसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही लोन घेऊ शकतात. 24 तासांच्या आता अप्रूव्ह होते हे लोन.

 

किती लोन घेता येईल...
अशा प्रकारचे लोन देणारे एक स्टार्टअप LetsMD द्वारे मेडिकल इमर्जन्सीमध्ये 20 हजारांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंतचे लोन देण्यात येते. लोन घेण्यासाठी रुग्णाला बँकांप्रमाणेच अटीशर्ती पूर्ण कराव्या लागतात. कर्जाची रक्कम ही घेणाऱ्याची पेइंग कपॅसिटी आणि इन्कमच्या आधारे मंजूर केली जाते. चांगली बाब अशी की, या कर्जावर ब्याज घेतले जात नाही. परंतु, 1 ते 2 टक्के प्रोसेसिंग फीस घेतली जाते. कर्जाची रक्कम जास्त असल्यास प्रोसेसिंग फीस घटवून 0.5 टक्के होऊ शकते.

 

कोण घेऊ शकते हे लोन?
- लोन घेण्यासाठी ग्राहकाची मंथली सॅलरी 15 हजार रुपयांपेक्षा जास्त असली पाहिजे. 
- आधार कार्ड आणि पॅन कार्डही असले पाहिजे.
- लोन घेण्यासाठी ग्राहकांना सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंटही दाखवावे लागेल. 
- ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाते. ती ठीक असल्यावर लोन दिले जाते. 
- कंपनी लोनसाठी लोकांकडून व्याज घेत नाही. तसेच यात कोणतेही छुपे चार्ज नाहीत. लोन दिल्यानंतर रुग्णालयांकडून निश्चित कमिशन घेतले जाते. 
- तुम्हालाही जर अशा प्रकारच्या लोनची गरज असेल तर तुम्ही www.letsmd.com वर व्हिजिट करून माहिती मिळवू शकता.   

 

 

बातम्या आणखी आहेत...