आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good Newwz Actress Anjana Sukhani Talked About Being Diagnosed With Depression After Losing Two Family Members

अंजना सुखानीने सांगितले दोन वर्षे बॉलिवूडपासून दूर राहण्याचे कारण, दोन फॅमिली मेंबर्सच्या निधनानंतर ग्रासले होते नैराश्याने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'कॉफी विद डी' (2017) या चित्रपटात शेवटची झळकल्यानंतर अभिनेत्री अंजना सुखानी दोन वर्षांनंतर आता मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.  अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी स्टारर 'गुड न्यूज' या आगामी चित्रपटात तिने वकिलाची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीत अंजनाने दोन वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्यामागचे कारण सांगितले. तिने सांगितल्यानुसार, दोन वर्षांपूर्वी तिच्या मावशीचे निधन झाले. तिची मावशी कॅन्सरशी लढा देत होती. पण अखेर उपचारादरम्यान तिने या जगाचा निरोप घेतला. मावशीच्या निधनानंतर अंजनाच्या आजीचे निधन झाले. कुटुंबातील व्यक्ती एकामागून एक साथ सोडून निघून गेल्याने अंजना डिप्रेशनमध्ये गेली होती. 

  • मावशीच्या वेदना बघून मी आतून बदलले : अंजना

अंजनाने मुंबई मिररसोबत बोलताना सांगितले, "माझी मावशी विवाहित नव्हती. त्यामुळे मीच तिच्यासोबत पूर्णवेळ असायची. इतकेच नव्हे तर किमोथेरपी सेशनवेळीही मी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये हजर असायची. एक वर्षभर तिने ज्या वेदना सहन केल्या त्या बघून मी स्वतः आतून खूप बदलले." अंंजनाने सांगितल्यानुसार, जेव्हा तिला तिच्या डिप्रेशनविषयी समजले तेव्हा तिच्या भावाने तिला डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता.     अंजना सांगते, "जेव्हा मी कठीण काळाचा सामना करत होते, तेव्हा मला कुणाशीही बोलताना घृणा वाटायची. मी फोनवरसुद्धा कुणाशी बोलत नव्हेत. नंतर मात्र उपचारांनी मी सामान्य झाले."

  • थेरेपीच्या दिवशी हमसून हमसून रडले होते...

अंजनाने सांगितल्यानुसार, थेरपीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांनी केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मी हमसून हमसून रडले होते. तेव्हा मला समजले होते की, मी क्लिनिकल डिप्रेशनने पीडित आहे. पहिल्या दिवशी माझा थेरपिस्ट एकही शब्द माझ्याशी बोलला नाही. मी फक्त रडत होते. चार महिने माझ्यावर उपचार सुरु होते. आजही कधीकधी मी निराश होते. पण आता जास्तीत जास्त आनंदात राहते."

  • 'मुंबई सागा'मध्ये झळकणार अंजना..

27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणा-या  'गुड न्यूज'सह अंजना अंजना जॉन अब्राहम, अनिल कपूर आणि इमरान हाश्मी स्टार 'मुंबई सागा'मध्ये झळकणार आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट जून 2020 मध्ये रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...