आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good Newwz: Akshay Kumar Spotted Doing Nagin Dance In Sauda Khara Khara Song Teaser

अक्षय कुमारने शेअर केली 'गुड न्यूज'मधील 'सौदा खरा-खरा'ची क्लिप, नवरदेवासोबत केला नागिन डान्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'गुड न्यूज' या चित्रपटातील 'सौदा खरा-खरा' या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. 17 सेकंदांच्या या क्लिपमध्ये दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी बेभान होऊन थिरकताना दिसत आहेत, तर दुसरीकडे अक्षय कुमार नवरदेवासोबत नागिन डान्स करताना दिसतोय. व्हिडिओ शेअर करुन अक्षयने "भांगडाची ग्लॅमरस वापसी' असे ट्वीट केले आहे. 'सौदा खरा-खरा' हे पूर्ण गाणे उद्या (मंगळवारी) रिलीज केले जाणार असल्याचेही त्याने ट्वीटमधून सांगितले आहे.

'सौदा खरा-खरा' हे चित्रपटातील दुसरे गाणे आहे. यापूर्वी निर्मात्यांनी 'चंडीगढ में' हे गाणे रिलीज केले होते.  हार्डी संधू, लीसा मिश्रा, असीस कौर यांनी या गाण्याला स्वरसाज चढवले आहे. या पार्टीत साँगमध्ये अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी हे चारही लीड स्टार्स थिरकताना दिसत आहेत. 

  • 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार चित्रपट...

'गुड न्यूज' हा चित्रपट दोन विवाहित दाम्पत्याची स्टोरी असून ते आयव्हीएफच्या माध्यमातून आईवडील होण्याचा निर्णय घेतात. पण आडनावं सारखी असल्याने अक्षय आणि दिलजीतच्या पात्रांच्या स्पर्मची अदलाबदली होती. त्यातून उडणारा गोंधळ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.