आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good Newwz Box Office Day 1 Collection; Good News Gathers 17.56 Crore Rupees On First Day

'गुड न्यूज'ने पहिल्या दिवशी जमवला 17.56 कोटींचा गल्ला, चांगली सुरुवात होऊनही टॉप 10 ओपनर्समधून बाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मिशन मंगल' 29.16 कोटी रुपयांसोबत टॉपवर आहे

बॉलिवूड डेस्क- अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी स्टारर 'गुड न्यूज'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली. ट्रेड एनालिस्ट तरन आदर्शने सांगितल्यानुसार, राज मेहता दिग्दर्शीत गुड न्यूजने पहिल्या दिवशी 17.56 कोटींची कमाई केली. तरण आदर्शनुसार चांगल्या रिव्ह्यूमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कमाईमध्ये वाढ होऊ शकते.

2019 मधील टॉप 10 ओपनर्समधून बाहेर

क्रिटिक्सकडून मिळालेल्या चांगल्या रिव्ह्यू आणि माउथ पब्लिसिटीमुळे शुक्रवारी संध्याकाळी चित्रपटाने गती पकडली. परंतु, 2019 च्या टॉप 10 ओपनर्समधून बाहेर पडला आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कमाई करण्याच्या बाबतीत चित्रपट 12 व्या स्थानावर आहे. तर 11 व्या क्रमांकावर 19.08 कोटींच्या कमाईसोबत अक्षयचाच नुकताच रिलीज झालेला 'हाउसफुल 4' आहे.

हे आहेत 2019 च्या टॉप 10 चित्रपट

रँक  चित्रपट रिलीज डेटपहिल्या दिवसाची कमाई
वॉर10 ऑक्टोबर  53.35 कोटी रुपये
एवेंजर्स : एंडगेम (हॉलीवुड)26 एप्रिल 53.10 कोटी रुपये
3भारत 5 जून 42.30 कोटी रुपये
4मिशन मंगल

15 ऑगस्ट 

29.16 कोटी रुपये
5दबंग 320 डिसेंबर24.50 कोटी रुपये
6साहो (हिंदी व्हर्जन)30 ऑगस्ट24.40 कोटी रुपये
7कलंक17 एप्रिल21.60 कोटी रुपये
8केसरी21 मार्च21.06 कोटी रुपये
9कबीर सिंह21 जून20.21 कोटी रुपये
10गली ब्वॉय14 फेब्रुअरी19.40 कोटी रुपये

     यावर्षी अक्षयचे 4 चित्रपट रिलीज झाले. यातील दोन 'मिशन मंगल' आणि 'केसरी' वर्षातील टॉप 10 ओपनर्समध्ये चौथ्या आणि आठव्या क्रमाकांवर आहेत. अक्षयच्या करिअरमधील 'गुड न्यूज' 7वा सर्वात मोठा ओपनर चित्रपट आहे. या लिस्टमध्ये यावर्षी रिलीज झालेला 'मिशन मंगल' 29.16 कोटी रुपयांसोबत टॉपवर आहे.

अक्षयची टॉप 7 ओपनर्स

रँकचित्रपटरिलीज डेटपहिल्या दिवसाची कमाई
1मिशन मंगल15 ऑगस्ट 201929.16 कोटी रुपये
2गोल्ड15 ऑगस्ट 201825.25 कोटी रुपये
केसरी22 मार्च 201921.06 कोटी रुपये
4सिंग इज ब्लिंग 2 ऑक्टोबर 201520.67 कोटी रुपये
52.0 (हिंदी व्हर्जन)29 नोव्हेंबर 201820.25 कोटी रुपये
6हाउसफुल 425 ऑक्टोबर 2019 19.08 कोटी रुपये
7गुड न्यूज27 डिसेंबर 201917.56 कोटी रुपये

नोट- अक्षय कुमार आणि रजनीकांत स्टारर '2.0' च्या सर्व वर्जन (हिंदी, तमिळ, तेलुगू)ने पहिल्या दिवशी एकत्रितपणे 81 कोटींची कमाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...