Health / केस दाट आणि मजबूत होण्यासाठी टक्कल करणे योग्य आहे की नाही , जाणून घ्या सत्य

टक्कल करवून घेतल्याने किंवा सगळेच केस काढून टाकल्याने केस गळण्याचे थांबतात आणि केसांची चांगली वाढ हाेऊ लागते असे मानले जाते परंतु येथे जाणून घ्या सत्य

रिलिजन डेस्क

Jun 24,2019 12:10:00 AM IST

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे केस गळतात किंबहुना झडू लागतात तेव्हा काही अतिउत्साही लाेक निरनिराळे उपाय सुचवू लागतात. असे म्हटले जाते की, टक्कल करवून घेतल्याने किंवा सगळेच केस काढून टाकल्याने केस गळण्याचे थांबतात आणि केसांची चांगली वाढ हाेऊ लागते. अर्थातच हा समज पूर्णत: चुकीचा आहे. खरे तर टक्कल करवून घेण्याने किंवा सतत दाढी केल्याने केस दाट किंवा मजबूत हाेत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, टक्कल केल्यानंतर केस वाढण्यास सुरुवात हाेेते, तर लहान केसांचे रंध्र अधिक ठळकपणे दिसू लागतात. त्यामुळेच आपणास केस दाट असल्यासारखे दिसू लागतात. वस्तुत: आपले केस काेणत्याही प्रकारे दाट झालेले नसतात.

वस्तुत: केसांची वाढ ही जेनेटिक तत्त्वांशी निगडित असते. टक्कल करवून घेण्याने केस दाट हाेत नाहीत किंवा वेगाने वाढत नाहीत. दाढी केल्याने केशकूप वाढत नाहीत किंवा गेलेले केस परत येत नाहीत. त्याचे कारण असे की, केशकूप आपल्या त्वचेच्या आत खाेलवर असतात आणि दाढी किंवा टक्कल केल्याने त्यावर काहीही परिणाम हाेत नाही. दुसरे कारण असे की, आतून उगवणाऱ्या केसांचे नुकसान तुलनेने कमी हाेते आणि म्हणूनच कदाचित त्यास स्वस्थ मानले जात असावे.


त्यावर काेणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. तथापि, जर डाेक्यावरील केसांत काेंडा खूपच झालेला असेल तर टक्कल करवून घेण्याने काेंडा घालवण्यास मदत हाेऊ शकते. जर केस खूपच गळत असतील किंवा झडत असतील तर टकले हाेण्यापूर्वीच एकदा त्वचाराेगतज्ज्ञ किंवा आहार विशेषज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

X
COMMENT