आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीच्या मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमुळे औरंगाबादकर साहित्य रसिक उत्साहीत, सोहळ्याचा भरभरुन प्रतिसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरी - दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी लिटरेचर फेस्टिव्हलला शहवासीयांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांच्या या सोहळ्यात साहित्य आणि कला रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. 

 

साहित्य क्षेत्रातील विवितध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कला क्षेत्रातील कलाकारांचे सादरीकरण याचा मेळ या सोहळ्यातून घालण्यात येत आहे. सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी औरंगाबादकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अत्यंत देखण्या अशा गोविंदभाई श्रॉफ साहित्य नगरीमध्ये साहित्य रसिकांनी सेल्फी आणि फोटोज घेत उत्साह दाखवला. सर्वस चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांना प्रेक्षक आणि रसिकांची चांगलीच गर्दी होती. उद्घाटनाच्या शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या कार्यक्रमाला तर पु.लं.देशपांडे सभागृह गच्च भरले होते. अनेक प्रेक्षक खाली बसून तर अनेक उभे राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. 

 

शुक्रवारनंतर शनिवारी आणि रविवारीही साहित्य आणि कलाप्रेमींसाठी भरभरुन कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. विविध कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवर याठिकाणी विविष विषयावर मार्गदर्शन करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...